शिंदखेडा तालुक्यात कर्ले ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ स्वताच्या नातेवाईकांना करुन दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्ले ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली ग्रामस्थांनी घरकुल योजनेत कुणाची नावे आहेत यादी वाचून दाखवा यासाठी आग्रह धरला होता ग्रामस्थांचा आक्रोश पाहुण ग्रामसभेत प्रस्तावित घरकुल यादीचे वाचन झाले परंतु त्या घरकुल यादीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे जवळच्या नातेवाईकांची नावे जास्त होती. घरकुल योजनेच्या यादीत एकाच घरातील दोन- तीन नावे समाविष्ट करण्यात आल्याने आमची नावे का नाही? म्हणून ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून आॅनलाईन फार्म भरला होता परंतु आमची नावे का आली नाही? अशी विचारणा करुन ग्रामसभेत जोरदार वादावादी सुरु झाली शासनाची घरकुल योजना गोरगरीब लोकांसाठी असते त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना अधिकार असल्याने नातेवाईकांना घरकुल योजनेचा फायदा मिळवून देतात. जशी ग्रामपंचायत कार्यालय आपली खाजगी मालमत्ता आहे असे समजून वापर करतात त्यामुळे गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही त्यासाठी ग्रामसभेचा अधिकार हा कायदा लागू केला त्यातून शासकीय कामकाज पारदर्शक होईल असा विश्वास होता. त्यानूसार लोकांना ग्रामसभेचा अधिकार मिळाला परंतु ग्रामसेवक व सरपंच ग्रामसभा घेण्याचे टाळाटाळ करतात. ग्रामसभा वर्षातून तीन वेळा होतात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे ला ग्रामसभा घेतलीच पाहिजे असा नियम आहे परंतु कर्ले गावात ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामसभा होईल अशी कुठलीही पुर्व सुचना अथवा दवंडी दिली नाही. याचा अर्थ गुपचूप ग्रामसभा घेऊन विषय मंजूर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न लोकांच्या गर्दीमुळे फसला. लोकांची गर्दी जमा झाली ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेत घरकुल लाभार्थी ग्रामपंचायत सदस्यांचे नातेवाईक निघाले यामुळे चांगलाच राडा झाला तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या गर्दीत सरपंच यांना धक्काबुक्की करुन संतप्त प्रतिक्रिया देतांना दिसत आहेत. घडलेला प्रकार म्हणजे लोकांचा सहनशीलेचा अंत होय तालुक्यात असेच प्रकार होत राहिले तर एक दिवस परिस्थिती गंभीर होऊन उद्रेक होईल. सरपंच ला धक्काबुक्की चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तरी जिल्हा परिषद प्रशासन दखल घेत नाही ग्रामसभेत सरपंच यांना धक्काबुक्की झाल्याची तालुक्यात चर्चा आहे परंतु कार्यवाही कुणावरही नाही...
* अहिल्या न्यूज मिडिया*
0 Comments