Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य. विद्यालयाचा शासकीय रेखाकला चित्रकलेच्या इंटरमिजीएट परीक्षेस शंभर पक्के निकाल




सी.जी.वारूडे (प्रतिनिधी-सुजान ना.)
दिनांक ०१/०२/२०२४ गुरुवार
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य. विद्यालयाचा शासकीय रेखाकला चित्रकलेच्या इंटरमिजीएट परीक्षेस २३विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले. निकाल १00% लागला.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था.संचलित अगस्तमुनी माध्य.विद्यालय कलमाडी या विद्यालयातील चित्रकलेचा इंलेमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा नुकताच १००% लागला असून त्यात इंटरमिजिएट परीक्षेत मुले -१० मुली-१३. एकूण-२३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
तसेच वरील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व चित्रकला मार्गदर्शक शिक्षक श्री.पी.आर.पाटील सर व श्री एस एस पाटील सर .या सर्वांचे संस्थेचे संस्थापक आदरणीय आबासो.श्री.जे.बी.पाटील व विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद या सर्वांच्यासमवेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
🌹🌹🌹💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments