Header Ads Widget

*सिसोदे महाविद्यालय श्रमसंस्कार शिबिराचे वारुड येथे उदघाटण*




नरडाणा: ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत कै.भाऊसाहेब एम. डी.सिसोदे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे दत्तक गाव वारुड येथे गुरुवार दि. 1 फेब्रूवारी 2024 रोजी "सक्षम युवा समर्थ भारत" या मध्यवर्ती   संकल्पणेवर आधारीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे माजी सैनिक मा. श्री. संदिप बेहरे यांच्या हस्ते उ‌दघाटण करण्यात आले. ग्रा. वि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब श्री. संजयकुमार सिसोदे यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. प्रा. विलास चव्हाण, माजी रासेयो संचालक, कबचौउमवि जळगाव, लोकनियुक्त सरपंच मा. सौ. शोभाबाई बोरसे, उपसरपंच श्री. आशिष निकम, पं. स. सदस्य, श्री. भगवान पिंगळे,  ग्रा.वि.शि.प्र.मंळाचे उपाध्यक्ष  दादासो. सिद्धार्थ सिसोदे, संचालक दादासो. परिक्षीत सिसोदे, श्री.अनिल चौधरी, शाळा नं.1 च्या मुख्याध्यापीका सौ. वंदना पाटील, शाळा नं.2 च्या मुख्याध्यापीका सौ. मनिषा बोरसे, शिक्षक, ग्रामस्थ, प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments