सुजाण नागरिक प्रतिनिधी -श्री.सी.जी.वारुडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात मा.मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,गेल्या महिन्यात दिनांक ७/१/२०२४ रोजी महाराष्ट्र टीचर्स असोशियन आयोजित "सन्मान कर्तृत्वाचा "या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक,मुख्याध्यापक पुरस्कार कार्यक्रम धुळे येथील रिद्धी -सिद्धी हाॅल नालंदा हाॅटेल शेजारी पारोळा रोड चौफुली धुळे येथे कार्यक्रम प्रसंगी आदरणीय खासदार श्री संजय राऊत साहेब व खासदार श्री विनायकजी राऊत साहेब,धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय श्री बाबासो. कुणालजी पाटील,आदरणीय आमदार दादासो आमशा पाडवी साहेब व महाराष्ट्र टीचर्स असोशियनच्या राज्य अध्यक्षा ताईसो.सौ शुभांगीताई पाटील व माजी आमदार दादासाहेब श्री.प्रा.शरदजी पाटील सर आदि वरील मान्यवरांचे हस्ते आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांचे तालुका,जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक , धार्मिक, सांस्कृतिक व जुनीपेंशन इ.कार्यात करीत असलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याचा गौरवार्थ म्हणून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आयोजित "सन्मान कर्तृत्वाचा" राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल..
आज आमच्या विद्यालयात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री.किशोरजी दराडे साहेब यांच्या माध्यमातून व त्यांचे सहकारी शिक्षक मा.श्री संतोष दगु देवरे सरजी व मा.श्री.सुभाष तुकाराम सोनवणे सरजी या सर्वांच्यावतीने आदरणीय मुख्याध्यापक आबासो.एस.ए.कदम यांना शाल, श्रीफळ देऊन अभिनंदनयुक्त सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक-हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेत.
🌹🌹🌹💐💐💐💐👏👏
0 Comments