*दोंडाईचा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ईद्रीस नायकवडी, अल्पसंख्यांक प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुरहान व राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश आण्णा सोनवणे यांच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आली, बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डाॅ नानासाहेब हेमंतराव देशमुख हे होते,*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी प्रस्तावना मांडतांना सांगितले की अल्पसंख्यांक विभाग हा राष्ट्रवादी पक्षाचा महत्त्वाचा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उप मुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार साहेबांचे विचार अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक घटका बरोबर पोहचले पाहीजेत आगामी निवडणुकी करीता पक्ष संघटना मजबूत करणे , अल्पसंख्यांक समाजाचे समाजीक, शैक्षणिक प्रश्न सोडविणे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे राज्यस्तरीय मेळावा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील सिडको एक्झिबेशन सेंटर हॉल ला आयोजित करण्यात आले आहे, अधिवेशन साठी धुळे जिल्ह्यातुन जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजाला माहिती देणे व त्या बाबत नियोजन करण्यात यावे अशी सुचना पदाधिकारीनां देण्यात आले,*
*ताहिर भाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ना. अजित दादा विकासा करीता महायुतीत सामील झाले आहे, तसेच मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळ ला पाचशे कोटी रुपये दिले पुढे ते एक हजार कोटी पर्यंत देणार आहेत, अध्यक्षस्थानी भाषणात डॉ. नानासाहेब हेमंतराव देशमुख यांनी सांगितले की राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे विकास पुरुष नेते आहेत, दादांची महाराष्ट्राला आज गरज आहे नियोजन बध्द कामाची पध्दत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हि मजबूत होत आहे , अजित दादानीं मुंबई राष्ट्रवादी पक्षाचा मेळाव्यात अल्पसंख्यांक समाजा बद्दल सांगितले होते की माझ्या महाराष्ट्राचा अल्पसंख्यांक समाजाला जो पर्यंत अजित दादा मंत्री मंडळात आहे तो अडचण येऊ देणार नाही असे सांगितले अल्पसंख्यांक समाजाचा पाच टक्के आरक्षण लागु करण्या साठी राज्य शासनाला भाग पाडतील अशी मला खात्री आहे, नाजीम शेख यांनी अल्पसंख्यांक विभागाची बैठकीचे आयोजन केल्या मुळे पदअधिकारी व कार्यकर्तेमध्ये चैतन्य निर्माण झाले दिसते,आपल्या समाजात शिक्षणाच्या ज्या समस्या जसे अल्पसंख्यांक शाळांना महाविद्यालयांना मान्यता देऊन अनुदान द्यावे अशी मागणी ना. अजित दादानं कडे करण्यात येईल असे सांगितले, बैठकीत राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहिर मिर्झा,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिपक जगताप, आर पी आय चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, अल्पसंख्यांक चे प्रदेश सचिव अय्युब पठाण, प्रदेश सचिव वाहिद शेख, प्रदेश सरचिटणीस रहिम मंसुरी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष करीम शाह राष्ट्रवादी ओ बी सी सेल चे* *जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, युवक चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे, युवक सरचिटणीस मोहसिन शेख, शहराध्यक्ष भरत जाधव, हरीष आव्हाड, अमर मराठे, भैय्या ड्रायव्हर, जफर मन्यार,रईस शेख, शिरपूर चे खाटीक जहुर कालु, मुस्तकीम मन्यार, जाकीर रज्जाक शेख, मिर्झा वाजीद बेग, साक्री हाजी शब्बीर शाह, शेख सादिक हुसेन, निजामपुर मतिन खान, विरदेल ता. शिंदखेडा मुस्तकीम कुरैशी, शकील मन्यार, जातोडा ता. शिंदखेडा फिरोज पटेल, स ईद पठाण बेटाव़द, आबीद शेख,अशपाक खा मन्यार, शरीफ शेख, गुलाब मन्यार, नासीर शेख ,अरबाज शेख, रईस शाह ,अरबाज असलम मन्यार, रियाज मिर्झा, तौसिफ शाह, अलताफ पठाण,मोहम्मद शेख,मुस्तकीम खान,शाहरूख शेख,अश्पाक पटवे, एजाज कुरैशी, दानिश शेख ,अजहर मिर्झा, सैय्यद जहिर हाशिम शेख व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते, बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी केले, आभार कार्याध्यक्ष करीम शाह यांनी केले*
0 Comments