Header Ads Widget

*शेवाडे येथील गणेश विद्यालयाल आनंद मेळावा व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न*



       शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - तालुक्यातील शेवाडे येथील                    गणेश हायस्कूल या शाळेत "आनंद मेळावा" व "रांगोळी स्पर्धा" मोठ्या उत्साहाने  संपन्न झाली. आनंद मेळाव्याचे उद्घाटन लामकानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय  पुरुषोत्तम पाकळे  व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन लामकानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव  एस.सी.पाकळे याच्या हस्ते करण्यात आले .उद्घाटन प्रसंगी लामकानी एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक शिवराम तेले , डॉक्टर भटूसिग ठाकूर तसेच अनिल विशाल तेले,  स्थानिक स्कूल कमिटीचे संचालक सुभाष पाटील , मुख्याध्यापक ए.के. अमृतसागर व पर्यवेक्षक देशमुख  सर्व शिक्षकवृद,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री एस पी पाटील व श्री बोरसे  यांनी केले या मेळाव्यासाठी मुख्याध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.श्री  आर. बी. मराठे  यांनी सुंदर फलकलेखन केले.  मेळाव्यामध्ये इयत्ता  पाचवी ते दहावी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेऊन विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ व वन भाज्या बनवून शाळेमध्ये स्टॉल लावले .सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन विविध पदार्थांचा स्वाद घेतला व बनवण्याची प्रक्रिया ची माहिती विचारली व विद्यार्थीनीनी समर्पक उत्तरे देऊन मान्यवरांना समाधानी केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनींचा व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन पदार्थ विकत घेतले व पदार्थाचा आनंद घेतला रांगोळी स्पर्धेमध्ये महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज, "बेटी बचाव बेटी पढाव",  श्रीराम ची प्रतिमा यांची व्यक्तिरेखा विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली व अतिशय उत्तम असा संदेश या रांगोळी  स्पर्धेतून दिला. मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे मनापासून कौतुक केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षेतर कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments