विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी बुधवारी जिल्ह्यात पहाटेपासून प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे एक संशयास्पद कंटेनर ताब्यात घेतला.
शिरपूर येथील थाळनेर गावात वाहनांच्या तपासणीत सुमारे 94 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सुमारे 10 हजार किलो चांदीचे सळे जप्त केले आहेत. या प्रकरणाची माहिती देताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले, "पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईत शिरपूर येथे एका कंटेनरमधून 94.68 कोटी रुपये किमतीचे 10 हजार किलो चांदीचा विटा जप्त करण्यात आले आहे."
या घटनेची माहिती देताना पोलिस अधिकारी म्हणाले, "राज्यात सध्या मतदान सुरू आहे. निवडणुकीच्या काळात पोलिस प्रशासनाकडून वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आज (20 नोव्हेंबर) पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात एका कंटेनरची झडती घेतली. दरम्यान ही चांदी जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनरमध्ये सापडलेल्या मौल्यवान वस्तू कोणत्या तरी बँकेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे याआधीही मुंबई पोलिसांनी गेल्या शनिवारी एका कंटेनरमधून साडेआठ हजार किलो चांदी जप्त केली होती. त्यांची किंमत 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि जीएसटी विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
राज्यातील धुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, धुळे पोलिसांचे पथक आज शिरपूर तालुक्यातील थरनेर गावात वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, कंटेनर वाहनातून 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 94 कोटी रुपये जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मोठ्या प्रमाणात चांदीची आवक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलीस नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी करत होते. या तपासणीनंतर त्या वाहनात चांदीच्या विटा सापडल्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, पोलिसांनी शिरपूर येथील एका मोठ्या कंटेनरमधून 94.68 कोटी रुपयांच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेली चांदी का आणली याचा तपास पोलीस पथकाने सुरू केला आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे.
0 Comments