Header Ads Widget

*आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार*




शिंदखेडा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले, ते तालुक्यासाठी शुभसंकेत आहे. या भागात काही सिंचन योजना मंजुर झाल्या आहेत त्या पुन्हा अस्तित्वात याव्यात म्हणून या नव्या सरकारात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवारांनी केली आहे.
मी स्वत: या मतदारसंघातील असून मी लहानपणापासुनच अनेक दुष्काळ पाहिले आहेत व सहन केले आहेत. या भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळून गेले आहेत. मी व माझ्या अनेक पिढ्यांनी शेती पाण्यावाचुन दुष्काळ पाहिले आहेत. व त्यांची सर्वांची गरीबी अनुभवली आहे. मतदारसंघात तापी नदी तुडुंब भरली आहे. पण शेतीला पाणी नाही. हा पुर्ण तालुका पाण्याने भिजल्याशिवाय हा मतदारसंघ सुजलाम-सुफलाम होणार नाही. तालुक्याच्या जनतेने आता मतभेद विसरुन आमदार जयकुमार रावलांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना मंत्रीमंडळात स्थान कसे मिळले हे जनतेने पहावे तरच या तालुक्याचे पांग फिटतील नाहीतर आपली गरिबी पाचविलाच पुजलेलीच आहे. विद्यमान आमदार तरुण, सुशिक्षित त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. या गोष्टी मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी जमेच्या बाजु आहेत.
मतदार संघातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून तालुक्याला मंत्रीमंडळात स्थान कसे मिळेल हे पहावे. मी स्वत: त्यांच्या पक्षाचा, विचार सरणीचा कार्यकर्ता नाही, तरी पण शेती व शेतकऱ्यांसाठी आपल्याला सर्वांना एक व्हावे लागेल नाहीतर पुढच्या पिढ्या आपल्याला कदापीही माफ करणार नाहीत, असे पत्रक दिलीप पवार सरांनी काढले आहे.

आपला स्नेहांकित
   *दिलीप पवार*
गिताई 13, उन्नती नगर,
नकाणे रोड,देवपुर धुळे
*मो. 9860191933*

Post a Comment

0 Comments