शिंदखेडा(वा.)-भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन हा समाजाचा कार्यक्रम नाही,तर भारताच्या जीडीपीचा कार्यक्रम
आहे.भ.महावीरांनी जे तत्व दिले त्या तत्त्वात घेणे नाही, तर देणे आहे. जैन समाज देण्यासाठी समजला जातो.असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.ते भारतीय संघटनेचे पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, समजात कमजोर वर्गाला ही जगण्याचा अधिकार आहे, त्याला यथार्थ रूप देण्याचा काम जैन संघटना करत आहे.पाण्याबाबत आमिर खान व जैन संघटनेने कार्य केले. पाण्यासाठी काम केल्याशिवाय शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाही. मूल्य शिक्षणच्या माध्यमाने भारतीय जैन संघटनेने विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रोपण केले.आप आगे बढे, हम आपके साथ है असा नारा त्यांनी दिला.
शरद पवार म्हणाले, लातूर किल्लारी भूकंपच्या वेळेस अनेक समस्या होत्या. त्यावेळी एकच नाव मला समोर आले ते शांतीलाल मुथा.ते भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करून जवळपास बाराशे अनाथ विद्यार्थ्यांना पुणे येथे शैक्षणिक पुनर्वसनासाठी आणले. गुजराथ भूकंपच्यावेळी तसेच शिक्षण क्षेत्रातही चांगले काम केले.जल,जंगल व जमीन च्या सुरक्षतेसाठी भारतीय संघटनेने जास्त लक्ष दिले पाहिजे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या कार्याच्या मी दहा वर्षापासून साक्षीदार आहे.राज्यात,देशात ज्या ज्या वेळी आपत्ती आली त्या त्या वेळी भारतीय संघटना नेहमी सातत्याने सेवा देण्यासाठी नेहमी तप्तर असते.कोविड काळात केलेले काम पुणेकर विसरू शकत नाही. चाळीस वर्ष सातत्याने संघटना सेवा देत आहे ही विशेष आहे.
शांतीलाल मुथा म्हणाले,शरद पवार यांच्या प्रेरणेमुळेच भारतीय जैन संघटना आज एवढे मोठे कार्य करू शकले.सन 2015पासून देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याचा कामाला प्रोत्साहन दीले.
बीजेएस व आमिर खान येत्या पांच वर्षाच्या काळात पाण्याबाबत सोबत काम करू.1985मध्ये सामूहिक विवाह, वर वधु परिचय मेळावा ई.कार्यक्रमापासुन भारतीय जैन संघटनेची सुरूवात झाली.तेव्हापासून शरद पवार यांनी प्रोत्साहन दीले.त्यांच्या सहकार्यानेच गुजराथ येथे 368 शाळा बनवु शकलो. कोविड काळात उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यामुळे धारावीला वाचू शकलो. महाराष्ट्राला मी आश्वासित करतो की ज्या ज्या वेळी आपत्ती येईल त्या त्या वेळी जैन समाज शंभर टक्के उभा राहील, दुष्काळग्रस्त क्षेत्रात पाण्यासाठी कार्य करण्यास कटीबद्ध आहे तसेच प्राथमिक शिक्षण चांगले होण्यासाठी मूल्य शिक्षणाचे काम सुरू राहील.
अभिनेता अमीर खान म्हणाले, मी पाणी फाउंडेशन चे काम 8 वर्षापूर्वी सुरु केले, त्यानंतर एक वर्षानी माझा व शांतीलाल मुथा,बीजेएस चा माझा संबंध आला. दोघांनी सोबत काम केलें. ते मी विसरू शकत नाही. अध्यक्ष सकल जैन समाज विजय दर्डा, चान्सिलर जैन युनिव्हर्सिटी चेअरमन चैनराज जैन, चेअरमन माणिकचंद ग्रुप प्रकाश धारिवाल, बीजेएस राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, जितो प्रेसिडेंट विजय भंडारी, गणपत चौधरी चेअरमन रिद्धी सिद्धी, बीजेएस राष्ट्रीय महामंत्री राजेंद्र फतावत, प्रोफेसर कन्नल मुदगोल, सत्यजित भटकळ,
ट्रस्टी वल्लभचंद भंसाली,आदींनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला,राष्ट्रिय सचिव दिपक चोपडा, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन , चेअरमन वर्धमान सांस्कृतिक भवन वालचंद संचेती, राजेश सुरेशदादा जैन,सरला मुथा,नरेंद्र जैन,राजेश मेहता,अध्यक्ष केतन शाह, राज्य सचिव प्रविण पारख व दुसऱ्या सत्रात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ ,भीमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश मिलेकर, प्रशांत बंब, परिणय फुके आदी उपस्थित होते.
खानदेशातून राज्य उपाध्यक्ष विनय पारख ,मा.राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा,राज्यकार्यकारणी सदस्य अशोक श्रीश्रीमाळ, विजय दुगड,विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा,उपाध्यक्ष सुमित मुनोत, जनरल सेक्रटरी अशोक राखेचा, राजेंद्र पारख,सेक्रेटरी विनोद जैन, जॉईन सेक्रेटरी जोशीला पागरिया कोषाध्यक्ष सचिन कोठारी,जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा,ऍड.अल्पेश जैन,संदिप मुनोत, तुषार दूगड शिंदखेडा शहराध्यक्ष मयूर जैन,सचिव लखीचंद बोथरा,अरुण जैन, सुनिल खिंवसरा आदी 75 सह महाराष्ट्र व विविध राज्यातून 3000कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन ट्रस्टी प्रफुल पारख वा राष्ट्रीय महामंत्री राजेंद्र फतावत यांनी केले.
0 Comments