Header Ads Widget

*यदा यदा ही धर्मस्य!...विजय हिंदुत्वाचा...!!* धुळे

धुळे ः विधानसभेच्या धुळ्याच्या जागेसाठी झालेल्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे भाजपा महायुतीचे दमदार उमेदवार अनुप अग्रवाल यांनी बाजी मारली.हिंदुत्वाचा विजय झाल्याच्या भावना जनतेतून प्रकट होताना दिसत आहे. हिंदुत्वाची कास आणि सोबतच विकासाचा ध्यास ठेवत अनुप अग्रवाल हे धुळे विधानसभेसाठी सज्ज झाले होते.भारतीय जनता पक्ष धुळ्यात मोठी ताकद असल्याने आणि मित्र पक्षांचे बळ मिळाल्याने अनुप अग्रवाल हे मोठ्या फरकाने विजयी झाले. विजयी मिरवणुकीत आलेला जनसमुदाय त्यांच्यासोबत किती समर्थन आहे हे अधोरेखीत करीत होता.
मतमोजणीनंतर सर्वत्र भगवे ध्वज फडकविले गेले. मुख्य रस्त्यांवर जल्लोष झाला. ही निवडणुक चुरीशीची होईल असे वाटत होते. परंतु अनुप अग्रवालांच्या करिष्म्याने निवडणुक एकतर्फी झाली. टफ फाईट झालीच नाही. भारतीय जनता युवामोर्चाच्या माध्यमातून नेतृत्व करत राजकीय यशाचे एक-एक टप्पे हा धर्मयोध्दा लिलया पार करत गेला. भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगर अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला बळकट करण्याचे धोरण अवंलबिले. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत असताना त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी इतर राजकीय पक्षाचे जनतेत रमणार्‍या नेत्यांना भाजपात आणले. मुळच्या भाजप कार्यकर्त्यांना देखील नेतृत्व गुण विकसीत करुन गेले. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी सशक्तपणे केली. त्याबळावर अग्रवाल यांनी महापालिकेत स्वबळांवर सत्ता मिळविण्याची गर्जना केली. २०१९ च्या महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला एतिहासीक यश मिळाले. ५० नगरसेवक  निवडुन आले. भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांशी असलेले संबंध कामी आले.तत्कालीन खासदार डॉ.सुभाष भामरे,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांसाठी मोठा निधी मिळविला. टॉवर गार्डनचे काम यानिधीतून होत आहे. पांझरा नदीकाठी सुंदर असे गार्डन तयार केले आहे.  अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना,देवपुरातील रस्ते, तसेच धुळे शहराच्या इतर भागातील रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी त्यांनी आणला. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व धुळेकर जनतेला दिसू लागले. धर्माभिमानी असलेल्या अनुपभैय्या अग्रवालांनी शिवजयंती उत्सव, श्रीराम नवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करीत जनतेत चैतन्य निर्माण करुन पांझरा नदीपात्रात अनुपभैय्यांचे कल्पेतून आणि प्रचंड मेहनेतीतून अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली. भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी धुळ्यासह आजूबाजूच्या गावातून श्रीराम भक्तांची रिघ लागली. अनुपभैय्या अग्रवालांची धर्मयोध्दा म्हणून ख्याती पसरू लागली. हिंदुवर कोठेही अन्याय होत असेल तर सर्वप्रथम धावून जाणारा नेता अशी त्यांची छबी निर्माण झाली. मागील दोन वर्षांपासून अनुप अग्रवाल हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागले होते. हिंदुत्वाला विकासाची जोड देत अनुप अग्रवाल हे विधानसभेसाठी सज्ज झाले. त्यांच्या प्रचाराचा थाटच त्यांच्या विजयाची नांदी देत होता. अपेक्षेप्रमाणे मोठे मताधिक्क्य मिळवून ते विजयी झाले.  पाच वर्षात शहराचा कशाप्रकारे कायापालट करणार आहेत. हे त्यांनी आधीच जनतेला सांगितले आहे.  राज्यातही भाजपा महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांसाठी निधी आणण्यात अनुप अग्रवाल यांना कोणताही अडसर येणार नाही.एमआयडीसीचे विस्तारीकरण करण्यावर प्राधान्य क्रमाने त्यांनी भर दिला तर धुळ्यातील बेरोजगार तरुणांना मोठा आधार मिळेल. एमआयडीसीच्या विस्तारीकरणातून उद्योग धंद्यांच्या माध्यमातून मोठा रोजगार तरुणांना उपबल्ध होईल.त्यामुळे गुन्हेगारी कमी व्हायला मदत होईल. शहराचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी आमदार अनुपभैय्या  अग्रवाल हे कटीबध्द असतील असा आम्हाला विश्वास वाटतो.त्यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments