शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- तालुक्यातील धमाणे येथील श्विजय विनायक पाटील यांच्या धमाणे गावातील राहत्या घरात आज दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता अचानक आग लागून घरातील सर्व
संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम जळून राख झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विजय विनायक पाटील हे बाहेरगावी नोकरीनिमित्त वास्तव्यास असून त्यांच्या धर्मपत्नी सौ. कोकीळाबाई विजय पाटील या धमाणे येथे आपल्या २ अपत्यांसह राहत असून त्या स्वतः मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण सांभाळीत अतिशय कष्टाने संसार करीत होत्या. परंतु अचानक अज्ञात कारणाने घरात लागलेल्या आगीने सगळं होत्याचं नव्हत झालं आणि संसार रस्त्यावर आला. आगीत रेफ्रिजरेटर, मिक्सर, इलेक्ट्रीक फिटींग, प्लॅस्टीक व कापडी सामान, मुलांचे शैक्षणिक साहित्य, संसारोपयोगी सामान तसेच प्लास्टीकच्या डब्यातील १५ हजार रु. रक्कम जळून खाक झाली. सदरील घटनेची माहिती कळताच धमाणे गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रा.पं. सदस्य भगवंतराव पाटील (आबा मुंडे) यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती धमाणे गावचे पोलीस पाटील व स्थानिक पोलिस स्टेशनला दिली तसेच पिडीत कुटुंबाला धीर दिला. झालेल्या घटनेत जिवितहानी नाही परंतु जी आर्धिक हानी झाली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर अशा प्रकारचे संकट कोसळणे वाईटच. सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून भगवंतराव पाटील (आबा मुंडे) यांनी समाजाचे काहीतरी देणे म्हणून सामाजिक भावनेतून पिडीत कुटुंबाला तात्काळ स्वतःकडून ५००० रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांच्या या मदतीचे धमाणे गावातून सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत धमाणे गावचे माजी सरपंच मोतीलाल दंगल पाटील, ग्रा.पं. सदस्य सुजित भैय्या पाटील, नंदलाल पाटील, अमोल मोहिते, आनंदराव पाटील, अनिल पाटील (बाबाजी), कुणाल पाटील, जयसिंग मोरे, आबा कोळी तसेच गावातील रमेश पाटील, विलास जाधव, रामकृष्ण कोळी, दादाभाई भिल, महेंद्र गिरासे तसेच परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.
0 Comments