. शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शहरातील आदिवासी वस्तींना घरकुल योजनेपासून शबरी योजनेतील जाचक अटी असल्या कारणाने वंचित राहावे लागत होते यासाठी गावठाण च्या विशेष मोहिमेतून विविध अटी, शर्ती कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासी प्रकल्प विभाग धुळे यांच्याकडे 57 प्रकल्प प्रस्ताव दाखल केले होते त्यानुसार नगरपंचायत विभागाला आदिवासी शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्ग केले असता सदरची 55 घरकुल प्रस्ताव मंजूर केले त्यानुसार आज तहसील कार्यालयात नगरपंचायत आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आदिवासी शबरी घरकुल मंजूर पत्र वाटप करण्यात आले . सदर आदिवासींना या योजनेच्या लाभापासून अनेक वर्षापासून वंचित होते याकरिता आदिवासी एकता परिषद सचिव गुलाब सोनवणे सह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज अखेर ते सत्यात उतरल्याने मंजूर पत्र हाती घेताना लाभार्थ्यांमध्ये आनंद दिसत होता. सदरच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत. याबद्दल मंत्री जयकुमार रावल व गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचे आभार आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी सह आभार लाभार्थीनी मानले. हयावेळी मंत्री जयकुमार रावल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, तहसीलदार अनिल गवांदे,नगरपंचायत प्रशासक पंकज पवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर आदिसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन नगरपंचायत चे अमरदीप गिरासे यांनी केले.
0 Comments