Header Ads Widget

*शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यादवराव सावंत यांचा सत्कार*


                   शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुणे येथे ग. दि. माडगुळकर नाटयगृहात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिलाच सत्कार शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ, पुष्पहार देवुन सर्व पदाधिकारीनी केला. हयावेळी शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सल्लागार प्रा. श्री.दिपक माळी, श्री. विजयसिंह गिरासे, तालुकाध्यक्ष श्री. भिका पाटील, तालुका सचिव प्रा. श्री. अजय बोरदे, संस्थापक सदस्य श्री. परेश शहा, श्री. जितेंद्र मेखे यासह पदाधिकारी उपस्थित होते. यादवराव सावंत हे देखील शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य असुन पुणे येथुन सन्मान स्विकारल्यानंतर घरी परत आले असता पहिलाच सत्कार संघाने केल्याबद्दल श्री. सावंत यांनी विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments