Header Ads Widget

*शिंदखेडा येथून पुण्यासाठी रेल्वे सुरू करा* *खासदार शोभा बच्छाव यांना दिपक देसलेचे निवेदन*


शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी : -             शिंदखेडा येथून पुणे येथे रेल्वेने जाण्यासाठी नवीन उधना पुणे रेल्वे सुरू करावी, तसेच येथील रेल्वे स्टेशनवर विविध सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी शिंदखेडा नगरपंचायतचे माजी प्रभारी नगराध्यक्ष दिपक देसले यांनी धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातून शैक्षणिक व औद्योगिक कामानिमित्त पुणे शहरात जाण्यासाठी व येण्यासाठी एकही रेल्वे गाडी उपलब्ध नाही. यामुळे शिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा,बेटावद, चिमठाणे येथील नागरिकांना व्यापार व इतर शैक्षणिक कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन खासगी वाहनांनी जावे लागत आहे. त्यामुळे पुणे येथे जाण्या-येण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात बऱ्याच वर्षांपासून शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांची मागणी आहे. मात्र, आतापर्यंत या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदखेडा येथे जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. तसेच उधना, शिंदखेडा, पुणे ही नवीन गाडी व वरील गाड्यांना थांबा मिळण्याबाबत आपण उचित कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी शिंदखेडा येथे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन धुळे लोकसभा खासदार शोभा बच्छाव यांनी शिंदखेडा नगरपंचायत माजी प्र.नगराध्यक्ष दिपक देसले सह शिष्टमंडळाला दिले.

Post a Comment

0 Comments