----------------------
*धुळे-* येथील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वनपरिक्षेत्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमा च्या निमित्ताने 'एक पेड माॅ के नाम', वृक्षारोपण, वृक्ष दिंडी, वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन करणे बाबत जनजागृती करण्यात आली.व त्याचे औचित्य साधून आज २९ जुलै रोजी देवपूरातील सातपुडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमास विभागीय वनाधिकारी श्रीमती राधिका फलफले सहाय्यक वनसंरक्षक कौतिक ढुमसे,वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील,सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुधीर जाधव, विश्वस्त सौ.प्रतिमाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रम वनपाल डी. एम. पाटील, वनपाल आखाडे, वनपाल श्री एस.डी. देवरे, एम. बी. चव्हाण, एस के. भामरे, श्रीमती दीपा कापडणे यांच्यासह सातपुडा शाळेचे मुख्याध्यापक एच. वाय. पवार सर, नगावहिल आश्रम शाळेचे प्राचार्य पी. बी.चव्हाण सर, प्राथमिक आश्रम शाळेचे प्राचार्य बी. आर. पावरासर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण संपन्न झाले.
----------------
0 Comments