Header Ads Widget

*सोनशेलू जि. प.मराठी शाळेत व अंगणवाडीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप विविध कामांचे उद्घाटन संपन्न*

  शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलु येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून जि प प्राथमीक मराठी शाळा व अंगणवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप व
 जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे उपस्थित होते. सोनशेलू जि प शाळेत एकूण 89 विद्यार्थी पटसंख्या असून प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर, पाटी, पेन्सिल ,वह्या, कंपास ,चित्रकला वही ,स्केचपेन, वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून दोन संगणक संच देखील देण्यात आले. तसेच अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पाट्या, पेन्सिल व अंगणवाडी क्रमांक एक व दोन या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. या सर्व कामांचे वाटप व उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर मॅडम, उपशिक्षणाधिकारी नगराळे, शिंदखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, गटशिक्षण अधिकारी डी एस सोनवणे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोन शेलु सरपंच तथा सरपंच महासेवा संघ धुळे जिल्हा अध्यक्ष प्रियंका बडगुजर यांनी केले. त्यांनी आजपर्यंत विविध योजनेतून व ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद मराठी शाळा व अंगणवाडीत केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा मांडला. तसेच जि प प्राथमीक मराठी शाळा व अंगणवाडी या गावातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण सोयी सुविधा पुरविणे यासाठी ग्रामपंचायत नेहमी सकारत्मक पद्धतीने विचार करत असते, आणि पुढेही करत राहील ,असे मत त्यांनी व्यक्त केले.
    या कार्यक्रमाच्या प्रसंगी जि प प्राथमीक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांनी देखील मनोगत व्यक्त केले की सोनशेलु शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या ही चांगली असून ती अशीच टिकून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत व अंगणवाडी केलेल्या सोयी सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. असेच प्रत्येक ग्रामपंचायतीने केले तर मराठी शाळा कधीच ओस पडणार नाहीत असे सांगितले. तसेच गटनेते भाईदास बडगुजर व सामाजिक कार्यकर्ते धीरज बडगुजर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.       कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले की ,विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे . प्रत्येक विद्यार्थ्याला संख्याज्ञान ,वाचन, लेखन या प्राथमिक क्रिया येणे आवश्यक आहे. आजचा तरुण हा उद्याचा भारत आहे आजचा विद्यार्थी मोबाईलच्या जगात गुंतलेला आहे.मोबाईल मुळे त्यांची विचारशक्ती ही थांबली आहे. त्याचे अभ्यासात मन लागत नाही. यामुळे त्याच्या मनावर वेगवेगळे दुष्परिणाम होत आहेत.याविषयी पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. तसेच ग्रामपंचायतीने राबवलेल्या शाळा व अंगणवाडीतील शैक्षणिक व भौतिक सुविधा व उपक्रमाविषयी त्यांनी कौतुक व समाधान व्यक्त केले. अशाप्रकारे प्रत्येक गावातील सरपंच हे जागृत असणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, माझे ही शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले आहे. म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा व अंगणवाडीचा विकास व वेळोवेळी सुधारणा करणे हेच माझे ध्येय आहे. तसेच सोनशेलू जि प प्राथमीक शाळेत पूर्वश्रमीचे शिक्षक प्रमोद पाटील यांनी दहा वर्ष उत्कृष्ट पद्धतीने अध्ययन अध्यापन केले. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते त्यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एक पेड मा के नाम या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राहुल राजपूत, शिवदास धनगरे , मनोहर म्हसदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बडगुजर ,उपाध्यक्ष देविदास धनगरे , रमेश धनगरे,पोलीस पाटील नरेंद्र गिरासे ,माजी सरपंच जयसिंग गिरासे ,ग्रामसेविका रोहिणी पवार ,मुख्याध्यापक पंढरीनाथ पांढरे, सुदाम जाट, नरेंद्र गिरासे अंगणवाडी सेविका माया म्हसदे,संगीता बडगुजर, नरेंद्र गिरासे राकेश गिरासे ,संतोष बडगुजर ,संदीप गिरासे, योगेश कोळी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिंदखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश नेतनराव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सासके यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी डी एस सोनवणे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments