Header Ads Widget

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा येथे शेकडो रक्तदातांनी केले रक्तदान 👉 आवाहनाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

              
      शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- 
  महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो युवकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनातून शिबीर आयोजित करण्यात आले होते. 
  रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. समाजातील प्रत्येक घटकाला वेळप्रसंगी रक्ताची गरज भासत असते. रक्त विना कुठल्याही व्यक्तीला जिव गमवावा लागणार नाही  या मुख्य उदेश्याने  *मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस* यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या शहर व तालुक्याच्या वतीने दोंडाईचा येथील दादासाहेब रावल महाविद्यालयात  सकाळी 9 वाजता रक्तदान शिबीराला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्ट्याचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल  यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.रक्तदान करण्याविषयी युवकांना आवाहन केले.शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक बागल व शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी सांगितले की, राज्यात एकाच वेळी हजारो युवक रक्तदान करत आहे. या उपक्रमा नंतर राज्यात प्रत्येक गरजू रुग्णला रक्त उपलब्ध होऊ शकते. या शिबिरा नंतर राज्यात रक्त अभावी कुठलाही रुग्ण दगावणार नाही अशी आशा आहे.  या शिबिरात शिंदखेडा मतदार संघासह दोंडाईचा शहरातील शेकडो युवकांनी रक्तदान केले. या शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त उत्साह दिसून आला. रक्तदान केलेल्या रक्तदाताना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. यावेळी  भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे,धुळे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, उपसभापती प्राध्यापक आर जी खैरनार,संचालक किशोर पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दोंडाईचा दीपक बागल,मोतीलाल वाकडे,शहराध्यक्ष दोंडाईचा जितेंद्र गिरासे,संजय कुमार महाजन शिंदखेडा शहराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य संजीवनी ताई सिसोदे, जिल्हा चिटणीस डी एस गिरासे, माझी पंचायत समिती उपसभापती रणजीतसिंग गिरासे,महेंद्र खैरनार, राजुबाबा धनगर,आदी उपस्थित होते. या शिबिराला धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन ब्लड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments