Header Ads Widget

*अतिशय देखणा असा अभिनव खान्देश प्रेरणादायी पुरस्कार सोहळा*

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे येथे झालेला गुणगौरव अर्थातच प्रेरणादायी पुरस्कार सोहळा म्हणतात ना "मरावे परी कीर्ती रुपी उरावे" हे उद्गार  स्वर्गवासी कै.नलिनी प्रभाकर सूर्यवंशी ताईंना प्रेरक ठरतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस वाढदिवस साजरे करत असतो पण पत्नीच्या मृत्यूनंतरही तिच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा सलग पाच वर्षापासून ते ही निशुल्क सभासद म्हणून एक रुपयाही न घेता धुळे शहरात प्रभाकर सुर्यवंशी सर घेत आहे.अशा या अभिनव खान्देश चे संस्थापक प्रभाकर सूर्यवंशी स्वतःच एक प्रेरणादायी व उत्साही व्यक्तीमत्व आहे.अनेक सामाजिक कार्यात त्यांनी योगदान दिले आहे. अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी अशा कार्याने तेजस्वी असणाऱ्या सूर्याला मानाचा मुजरा कुठल्याही बड्या नेत्याची मदत न घेता आज पर्यंत 46 स्त्रियांचा सन्मान ते व त्यांचा परिवार पाच वर्षापासून करत आहेत या कार्यक्रमास ना नानासो सुभाषजी अहिरे डॉक्टर जितेंद्र ठाकूर श्री सोमनाथ बागुल श्री प्रशांत वाघ श्री सुरवाडे श्री मुकेश ठाकूर ललित चव्हाण अभिनव खांदेश्वर प्रेम करणारे शुभचिंतक यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रत्ना पाटील व श्रीमती कल्पना देशमुख यांनी खूपच उत्तम केले तसेच माझ्यासारख्या पुरस्कारार्थी माजी आमदार दीपाताई चव्हाण बागलाण गझलकार मृणालताई 
उमाताई माळी सोलापूर आरती बेलांकर देवळा वैशाली बच्छाव सिन्नर वैशाली वाघ येवला जयश्री राठोड धुळे आणि राजश्री पाटील पोलीस कॉन्स्टेबल धुळे यांनी भर पावसात येऊन आपापला पुरस्कार स्वीकारला व खूपच सुंदर शब्दात आपले मनोगत मांडले नानासो सुभाष अहिरे सरांनी आई वरील कविता पठण करून सर्व श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले आणि कार्यक्रमाची सांगता केली.

आ.स्नेहांकित
छाया बोरसे
रुग्णसेविका दशक हॉस्पिटल धुळे

Post a Comment

0 Comments