देशाच्या सीमेवर आपल शीर तळ हातावर घेऊन जागता पहारा देणारा
सैनिक जितका महत्त्वाचा आहे , तितकाच देशांतर्गत
शांतता टिकवून धरण्यासाठी योगदान देणारा पोलीस सही महत्वाचा आहे.
अशा या महत्वपूर्ण घटकांची अस्मिता टिकवून धरण्याची जबाबदारी जशी, जनतेची, लोकप्रतिनिधींची आहे तशी स्वतः पोलीसांनी सुद्धा आहे.
लोकहीतार्थ, देश हितार्थ जे पोलीस जबाबदारीची जाणीव ठेवून कुठल्याही मोहाला, दडपणाला बळी न पडता प्रामाणिक सेवा करतात त्यांना लोकाश्रय व राजाश्रय मिळणे गरजेचे आहे.
जे आपल्या दुष्कृत्याने पोलीस पेशाला बदनाम करतात त्यांना दंडित करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
जावेद अहमद नावाचे,उत्तर प्रदेशातील, निवृत्त ,१९८० च्या ब्याचचे आय पी एस पोलीस अधिकारी, केवळ देश सेवा करायची म्हणून केवळ एक रुपया रुपया पगार घ्यायचे. घरचे ते श्रीमंत होते, म्हणून ते शक्य होते.पण ही दानत सुद्धा
महत्वाची आहे. ३६वर्षे सेवा देणार्या या अधिकार्यिने खाजगी कामासाठी सरकारी
गाडीचा कधी वापर केला नाही.
दुसरीकडे कुलकर्णी नामक , ऊप अधिक्षक दर्जाचे
पोलीस अधिकारी आपल्या अधिकाराचा, आपल्या अंगावरील वर्दीचा गैर वापर करित, भर रस्त्यावर पोलीसांच्या तावडीत असलेल्या आंदोलकाच्या
पेकाटात , आंदोलकांच्या लहान मुला समक्ष फुटांची लाथ उसळून मारतानाचे किळसवाणे दृष्य पोलीस विभागाला बदनाम करणारे व सर्व सामान्य जनतेला क्लेश देणारे आहे.
गवंड्याच्या हाताखाली मजुरी करणार्यां बापाचा आणि इतरांच्या शेतात मजुरी करणार्या मातेचा दिलीप भुजबळ नावाचा मुलगा मुलगा आप पी एस होऊन, पोलीस खात्यात पोलीस महानिरीक्षक
दर्जा पंर्यत पोहचतो ही बाब कष्टकरी तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
विश्वास नांगरे पाटील सारख्या अधिकार्यांचे पोलीस विभागातील योगदान देखील दखलपात्र आहे.
0 Comments