Header Ads Widget

*एम एच एस एस हाय. मध्ये पोळा सण साजरा*


 
शिंदखेडा येथील एम एच एस एस हायस्कूल मध्ये पोळा सण साजरा करण्यात आला. बैलाशिवाय नाही पर्याय शेतीला, आपल्या अन्न- धान्यसाठी कष्ट करणाऱ्या
 बैलाची पूजा सूर्यवंशी मॅडम यांनी केली, प्रसंगी मिरवणुक शाळेपासून शिवाजी चौफुली, जी प शाळा नं.2,5,7 व परत एम एच एस एस हाय. अशी काढण्यात आली.जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे मॅडम यांनी मिरवणुकीचे स्वागत केले.ओम सुतार,भावेश पाटील,यांनी सहभाग घेतला त्यांना श्री देशमुखसर, श्री सुर्यवंशी सर,यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी मुख्याध्यापक-टी एन पाटील, पर्यवेक्षक - नेरपगार सर, सर्व शिक्षक वृन्द, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments