शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियान माहिती शिक्षण प्रसार व जनजागृती घटका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन जागृती कार्यशाळेचे नगरपंचायत शिंदखेडा यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य श्री एस एस पाटील यांनी भूषवले. याप्रसंगी नाशिक विभाग एक्झिक्यूटिव्ह अधिकारी श्री देवेंद्र केळोदे, जळगाव प्रोग्राम ऑफिसर मुकेश चव्हाण, नाशिक प्रोग्राम एक्झिक्यूटिव्ह बाळकृष्ण यादव, यांसह पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस ए पाटील श्री एस के जाधव श्री डी एच सोनवणे, श्री जे डी बोरसे श्री ए.टी.पाटील श्रीमती व्ही एच पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सध्या पूर्ण विश्वाला चिंता असणारा कचरा या समस्येवर व त्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसे करता येते कचरा ही समस्या नसून एक इंधनाचा स्रोत व शेतासाठी खत बनू शकते याची सखोल माहिती श्री देवेंद्र केळोदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करून दिली तसेच शिंदखेडा शहर कचरामुक्त करण्याची शपथ देखील विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. तसेच श्री मुकेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या बाबतीतले पोस्टर्स व बैठ खेळ घेत कचऱ्याचे प्रकार समजावून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments