*जनता हायस्कूलच्या सचिव तथा माजी सभापती ताईसो मीरा मनोहर पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण धुळे जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचा कार्यक्रम संपन्न.*
*मा.ना. जयकुमारभाऊ रावल, कॅबिनेट मंत्री पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य*, यांच्या आदेशाने
*सौ.मीराताई मनोहर पाटील* यांची भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण *जिल्हाचिटणीस* पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे श्रीमती एन जी देसले श्रीमती व्ही एच पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ताईंना राजकीय वारसा त्यांचे वडिल कै. अर्जुन आबा पाटील यांच्याकडून मिळाला तसेच ताईंच्या या यशामागे संस्थाअध्यक्ष भाऊसो श्री मनोहर गोरख पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते.असे मत श्री एस ए पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच ताईं या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आणि लोकसेवेत त्यांचे मोलाचे योगदान असते असे मत श्री एस के जाधव यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त केले.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांच्याकडून ताईंना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments