पुणे - ब्रम्हांडनायक ब्रह्मसेवा राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख पदी माजलगाव येथील माजलगाव परिसर चे संस्थापक संपादक प्रदीप कुलकर्णी यांची नियुक्ती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रफुल व्यंकटेश कुलकर्णी यांनी केली आहे.
ब्राह्मणांचे एक देशव्यापी संघटन व्हावे या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रफुल व्यंकटेश कुलकर्णी यांनी काही निवडी जाहीर केल्या आहेत त्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख म्हणून अरुणराव पाठक राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख प्रदीप कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री आफळे गुरुजी, गुजरात विभाग प्रमुख मेजर श्री श्रीकांत कुलकर्णी, राजस्थान विभाग प्रमुख आचार्य श्री राजेश्वर महाराज आदी निवडी त्यांनी जाहीर केल्या असून लवकरच संपूर्ण देशभर विविध पदाधिकारी जाहीर करण्यात येतील असे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
0 Comments