Header Ads Widget

*दोंडाईचा शहरातील पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या कामाचं सर्व सामान्य* *नागरिकांकडून होतयं कौतुक*


दोंडाईचा : दोंडाईचा शहराची कायदा व सुव्यवस्थाच्या बाबतीतली परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. दिवसाढवळ्या चोऱ्या,अवैध धंदेवाईकांची मुजोरी बिनधास्तपणे चालू होती ती कोणाच्या आर्शिवादाने सुरू होती ते दोंडाईचेतील सर्व सामान्य नागरिकांना ज्ञात आहे. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी समाजासाठी एक आदर्श असतात. त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाजाला सुरक्षित आणि न्यायपूर्ण वातावरण मिळण्यास मदत होते.दोंडाईचा शहरातील मागील काही दिवसापासून चोरींचे प्रमाण वाढले होते अवैध धंदेवाईकांचा सुळसुळाट सुरू होता परंतु नवीन रूजू झालेले पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी लोकशाहीत अधिकारी म्हणून कायदा सुव्यवस्था कशी असावी याचे उत्तम उदाहरण दोंडाईचेतील नागरिकांना सध्याच्या पोलीस कार्यवाहीच्या माध्यमातून दिले आहे.सध्या दोंडाईचेतील नागरिक आपसात बोलतांना सोनवणे साहेबांचे कौतुक करतांना दिसतं आहे अधिकारी असावा तर असा पण यात किती दिवस सात्यत राहणार याबाबत ही नागरिक शंका उपस्थित करत आहेत कारण आका आपल्या राजेशाही थाटासाठी विरोधकांनावर खोटे गुन्हे दाखल करणे अवैध व्यवसायीक कार्यकर्तांना संजीवनी बुटी देणे हेचं तर दोंडाईचेत सुरू आहे त्याला कुठेतरी आपण थांबवले आहे

आगामी काळात हिंदू धर्मातील विविध प्रकारचे सण त्योहार येत आहेत जसे की गणपती उत्सव , नवरात्र यात तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी दोंडाईचा शहरासाठी लाभणे म्हणजे नशीबचं

एक अधिकारी म्हणून आपण दोंडाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था जशी अबाधित राखली आहे त्या बाबत खरचं आपलं कौतुक होतं आहे. यात सात्यतं राहिले तर एकतर आपली बदली होईल आणि बदली जरी झाली तरी सर्व सामान्य माणसाचा हृदयात आपले स्थान श्रेष्ठ व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणूनचं राहिलं

धन्यवाद ..! कर्तव्यदक्ष अधिकारी असला तर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कशी असावी याची जाणीव करून दिल्याबद्दल आपले दोंडाईचेतील नागरिकांचा वतीने आपले मन:पुर्वक आभार 

 *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा ( महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शिंदखेडा तालुका )*

Post a Comment

0 Comments