तायथरे :- तामथरेकरांची जिद्द, श्रद्धा, विश्वास, आणि चिकाटी यामुळे साकारणाऱ्या
श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा
द्वारे केवळ तायथरेचाच नाही तर संपूर्ण सिंदखेडा तालुक्याचा कायापालट होणार असा आत्मविश्वास
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता
अनिल पवार यांनी व्यक्त केला.
गोकुळ अष्टमी, ज्ञानेश्वर
जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन तामथरेतील संकल्पीत
श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर
परिसरात महेश बाबा घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख
अतिथी म्हणून अनिल पवार बोलत होते.
सर्वश्री अनिल पवार, धुळ्यातील ऊद्योजक, अग्रवाल समाजाचे नेते विनोदभाऊ मित्तल, सुनिल सिंघानिया, डॉ. जगदिश गिंदोडिया, डॉ.सौ संगिता गिंदोडीया, महेश बाबा घुगे
यांच्या हस्ते , प्रसन्न वातावरणात भगवंताची आरती करुन जयघोष करण्यात करण्यात आला
सुरवातीला, श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. महेंद्र महाराज यांनी संस्थानच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार केला. या प्रकल्पाच्या ऊभारणीत जे जे सहकार्य अपेक्षित राहिलं ते करण्याचं
आश्वासन मान्यवरांनी यावेळी दिले
श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर , तथा भक्ती निवासाच्या बांधकामाची आणि गोशाळेची पहाणी यावेळी मान्यवरांनी केली व
समाधान व्यक्त केले.
श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकाम समितीचे मान्यवर सदस्य तथा पंचक्रोशितले ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
""""""""""""""""""""""""""""""""
. ,
0 Comments