Header Ads Widget

टेकवाडे कृषी सखी महिला सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाने शेतातच पोळा साजरा करून दिला आदर्श

कृषी सखी महिला सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाने शेतातच पोळा साजरा करून दिला आदर्श
(टेकवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे – दि. 20 ऑगस्ट 2025)
कृषी सखी महिला सेंद्रिय शेतकरी उत्पादक गट, टेकवाडे यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबवत थेट कापूस पिकाच्या बांधावर पोळा उत्सव साजरा केला. कृषी विभाग आत्मा अंतर्गत सुरु असलेल्या सेंद्रिय शेती शाळेत पारंपारिक गाणी, भूमी पूजन आणि बैलांची पूजा करीत महिलांनी शेती व बैल यांचे अतूट नाते जपण्याचा संदेश दिला.

या शेती शाळेत दर पंधरवड्याला  देशी कापूस लागवड व्यवस्थापन, कापुस पीक परी संस्था अभ्यास, किड-रोग नियंत्रण अभ्यास , मित्र व शत्रु किड ओळख, सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, काढणी व विक्री व्यवस्थापन अशा विषयांवर प्रत्यक्ष प्रयोगात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. त्यात महिलांनी “पोळा” हा सण प्रत्यक्ष बांधावर साजरा करून एक अभिनव प्रयोग घडवून आणला.

प्रसंगी प्रकल्प संचालक आत्मा, धुळे श्री. हितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की,
“शेतकरी आणि बैल यांचे नाते अतूट आहे. बैल तसेच काळ्या आई (माती) यांचे उपकार आपण सदैव मान्य केले पाहिजेत. शेती शाश्वत करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना जिवंत जमीन देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती स्वीकारणे अत्यावश्यक आहे.”

या कार्यक्रमास डॉ. आतिश पाटील (कृषि विज्ञान केंद्र, धुळे), श्री. दिलीप पाटील (वडने कृषीभूषण सेंद्रिय शेती), श्री. अविनाश पाटील व मधुकर पाटील (जयभूमी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी) यांनी मार्गदर्शन केले.

कृषी विभागातील अधिकारी –
श्री. शुभम शिरसाट (मंडळ कृषी अधिकारी), श्री. दीपक पाटील (उप कृषी अधिकारी), श्री. एन. एन. महाजन (उप कृषी अधिकारी), श्री. ललित पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. महेंद्र पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. अतुल बाविस्कर (सहाय्यक कृषी अधिकारी), श्रीमती प्रज्ञा मोरे (बी.टी.एम.) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य केले.

तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. सदाशिव वाडीले व कृषी सखी श्रीमती मनीषा कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अभिनव प्रयोगातून महिला सेंद्रिय गटाने पोळा उत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये एकजुटीचा संदेश दिला आणि जिल्ह्यात एक आदर्श ठेवला.


---

Post a Comment

0 Comments