अमळनेर -लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अमळनेर सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघ यांच्या वतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना 'पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार' वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. सुरुवातीला पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म.सा.प अध्यक्ष संदीप घोरपडे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेल तालुकाध्यक्ष एस सी तेले सर यांनी केले .माजी आमदार डॉ. बी एस पाटील, मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासो बन्सीलाल भागवत,युवा कल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. अशोक पवार सर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राजश्रीताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (शरद पवार ) डी एम पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काढण्यात आलेल्या साप्ताहिक लेखन मंच या अंकाच्या प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अजय भामरे सरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर कविता सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे सर यांनी अध्यक्षीय भाषण विनोदी पद्धतीने करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान भाऊ धनगर , कृ.बा.स.संचालक नितीन पाटील, माजी भाजप शहराध्यक्ष हरचंद लांडगे, रियाज शेख, रज्जाक शेख , कदम भाऊसाहेब उपस्थित होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . या पुरस्काचे स्वरूप सन्मानपत्र ,ट्रॉफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुस्तक, दुपट्टा ,शाल ,फेटा ,बुके देऊन करण्यात आला. पुरस्कारार्थी महिला जयश्री पवार ,पूजा शहा, भारती सोनवणे ,माधुरी पाटील ,डॉ. मनीषा लाठी, सुवर्णा धनगर ,सुशीला अहिरे, क्रांती पाटील, भारती बाविस्कर, आशा महाजन ,आशाबाई लांडगे, जयश्री बडगुजर, मनिषा पाटील ,प्रा. डॉ.शबीना शेख, सुदर्शना पाटील, तिलोत्तमा पाटील, सीमा रगडे, अश्विनी भिल ,रूपाली धनगर या महिलांना देण्यात आला. तसेच पुरस्कारार्थी महिलांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे अतिशय रंगतदार सूत्रसंचालन स्नेहा एकतारे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन आनंदा धनगर सर यांनी केले .कार्यक्रमाची सर्व व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी करून दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हमाल मापाडी संघटना अध्यक्ष रमेश देव शिरसाठ,माजी न.पा.शिक्षण मंडळ सभापती नितीन निळे, मौर्य क्रांती संघ तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कंखरे, दिलीप ठाकरे ,विजय मोरे, दयाराम पाटील, ईश्वर महाजन सर, उमेश काटे सर ,गोपाल हडपे सर, बापूराव ठाकरे, प्रा. दिनेश भलकार ,प्रा. मनोज रत्नापारखे सर, विकास सुर्यवंशी, धनराज लांडगे यांनी केले.
0 Comments