तांदळी:-दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ तांदळी यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावीत प्रथम श्रेणी व विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ज्येष्ठ पत्रकार श्री गोपी दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तांदळी येथे संपन्न झाला .सदर कार्यक्रमास तांदळी गावाच्या सरपंच सौ. रत्नाबाई सुनील परदेशी शहापूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनगर सर , श्री रणजीत लांडगे सर , बालविकास प्रकल्प अधिकारी श्री विजयसिंह परदेशी , श्री करतार बाबा परदेशी, श्री सुनील परदेशी, श्री गुलाब बापू पाटील, श्री सुरेश आबा पाटील, श्री एकनाथ मिस्त्री, गणेश अप्पा ,युवराज महाजन गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी , प्राथमिक शाळेतील शिक्षक इत्यादी उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत विद्येच्या देवता सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .विभावरी परदेसी स्वागत गीत सादर केले
प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री धनगर गुरुजी श्री रणजित लांडगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे शहापूरचे मुख्याध्यापक आनंदा के.धनगर सरांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थी गुण गौरव सोहळा हा अतिशय स्तुत्य व प्रोत्साहन देणारा उपक्रम असून विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे त्यांच्या वडिलांच्या कष्टाचे, शिक्षकाच्या मार्गदर्शनाचे व त्यांच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे.जिद्द, चिकाटी व परिश्रम असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते.आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपण ज्या मातीत जन्मलो,वाढलो व घडलो त्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करा. गावाचे सुपुत्र श्री विजयसिंह परदेशी बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा व व यशस्वी वाटचालीचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर आपल्या मनोगत तून व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचा सत्कार
गावातील मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेले श्री छगन तिरमले, महसूल विभागात त उत्कृष्ट काम केलेले श्री वासुदेव लक्ष्मण तिरमले , बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांचा सह पत्नी सत्कार करण्यात आला . श्री चौधरी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी यांच्या आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.
सदरील बातमी छायाचित्रासह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी
गो.पी.लांडगे
ज्येष्ठ पत्रकार धुळे
मो.नं.9422795910
0 Comments