आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी.
मुडावद येथील त्रिवेणी संगमावरील श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर परिसर पर्यटकांना खुणावत आहे. आज दुसरा श्रावण सोमवार असून, भाविकांची मोठी गर्दी यानिमित होणार आहे १७व्या शतकातील हे मंदिर असून, १६ दगडी स्तंभांवर सभामंडप, सकाळचे सूर्यकिरण थेट पिंडीवर पडत असते या परिसरात नौकायान करत जलपर्यटनाचाही आनंद लुटता येतो त्यामुळे श्रावणातच नाही तर वर्षभर येथे भाविकांचा आणि पर्यटकांचा राबता असतो
तापी, पांझरा आणि गुप्त कपिलगंगा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या मुडावद येथील अतिप्राचीन तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर श्रावण मासनिमित सज्ज आहे श्रवण मासनिमित दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या ठिकाणी श्रावणात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते मुडावद येथे कपिलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे
कपिलमुनी ऋषींच्या तपसाधनेने ही भूमी पवित्र असल्याची मान्यता आहे. श्री श्रवण महिन्यात तापीमाईची विधिवत पूजा व श्री महादेव पूजन, अभिषेक कार्यक्रम दररोज होतात.
सकाळी पर्व स्नान, तापी मातेची महाआरती होत असते संपूर्ण खान्देशच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश येथील भाविक या ठिकाणी येऊन श्री महादेव जलाभिषेक नेहमीच करीत असतात. याशिवाय प्रवचन, पूजा, आरत्या, मानता, नवस,
आदी कार्यक्रम या तीर्थक्षेत्रावरती संपन्न होतात, तसेच अनेक दाते महाप्रसादाचे देखील आयोजन करीत असतात.
मंदिराची अख्यायिका
---------------------------
कपिलेश्वर मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी कपिलमुनी यांनी तपश्चर्या करून महादेव पिंडीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम १७ व्या शतकात झाले आहे. कोरीव नक्षीकाम आहे. मंदिराच्या सभा मंडपाची रचना आकर्षक आहे. तिन्ही दिशांनी प्रवेशद्वार आहे
प्रत्येक मार्गावर प्रवेशद्वार आहे १६ दगड़ी स्तंभावर सभामंडप आहे. मंदिराच्या समोर उंच दीपमाळ आहे. समोरून तापी नदी, मागे पांझरा नदी वाहते, चौफेर निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरण दिसते. मंदिर गाभाऱ्यात तीन शिवलिंग आहेत. सकाळचे सूर्यकिरण पिंडीवर पडते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. तसा शिलालेख आढळून येतो.
0 Comments