Header Ads Widget

शिंदखेड्यात रमाई नगरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी


प्रतिनिधी l शिंदखेडा : शिंदखेडा येथील रमाई नगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शुभारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा शहराचे सपोनि हनुमान गायकवाड तर विशेष अतिथी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, विकास सोसायटी संचालक रमेश भामरे, माजी नगरसेवक चेतन परमार,जिल्हा चिटणीस प्रविण माळी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले,भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, माजी पं स सदस्य प्रकाश चौधरी गुलाब सोनवणे, भाजपा शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे व राजू शिरसाठ यांची उपस्थिती होती.
 या कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे  नियोजन  व आयोजन माजी नगरसेवक बबन सकट यांनी केलेले होते. कार्यक्रमाप्रसंगी गटनेते अनिल वानखेडे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्याचे १०० किट इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. गटनेते अनिल वानखडे यांचे संकल्पना असे आहे की शिंदखेडा शहरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. प्रसंगी प्रविण माळी, संजयकुमार महाजन, प्रकाश चौधरी व सपोनि हनुमान गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी आभार प्रदर्शन मधुकर लोंढे यांनी केले 

प्रसंगी यांची होती उपस्थिती 

भूपेंद्र देवरे,किसन सकट, मिलिंद पाटोळे,राजु शिरसाठ, पोलीस आनंद पवार, सचिन माळी, जगन सकट, भास्कर कसबे,शिवा पाथरे,स़जय सकट,संजय ऊमप,भगवान कसबे, पुना पाथरे,मनोज ऊमप आदी

Post a Comment

0 Comments