शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- येथील कल्पतुळशी शैक्षणिक संकुलातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दीना निमित्त ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम वाडीले, सदस्या सौ कल्पनाताई वाडीले व सदस्या सौ साधना ताई तमखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आण्णासाहेब तुळशीराम वाडीले तर प्रमुख मान्यवर म्हणून कल्पनाताई वाडीले, साधना तमखाने व मुख्याध्यापक गजानन बच्छाव हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करून करण्यात आली. हर घर तिरंगा अभियानातंर्गत देशभक्तीपर संगीताच्या तालावर विदयार्थ्यांचे कवायत घेण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती निमित्त पसायदान चे पठण घेण्यात आले. गोकुळ अष्टमीनिमित्ताने शाळेतील विदयार्थ्यांनी श्री कृष्ण व राधा यांची भूमिका करत दही हंडी फोडली. देशभक्ती पर मुलांनी नृत्य साजरा केले. हर घर तिरंगा अभियांतर्गत शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांचे विजयी विदयार्थ्यांचे कौतुक करत इतर ही विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविण्याचे आव्हाहन केले. प्रमुख अतिथी साधना तमखाने यांनी एक पेड माँ के नाम लावण्यासाठी उपस्थित विदयार्थ्यांना व नागरिकांना आव्हान केले तर कल्पनाताई वाडीले यांनी शाळेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. शाळेचे मुख्याध्यापक यांनी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्य बद्दल उपस्थितांना सांगत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाडीले आणि सचिव स्वाती वाडीले यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन उपशिक्षक एस. आर. चव्हाण आभार भुपेंद्र मराठे यांनी व्यक्त केलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments