शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी - येथील ज्ञानज्योती प्री प्रायमरी स्कूल आणि एचबीटी इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष प्रा दीपक माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी रंजकपणे सामान्य ज्ञान आणि संविधानाबद्दल कार्यक्रम सादर केला.
सुरुवातीला प्राचार्य प्रा अनिल माळी, सौ आशा माळी यांनी प्रतिमा पूजन केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी संविधानात असलेली मूलभूत हक्क कर्तव्य याबाबत सर्व १८ आर्टिकल म्हणून दाखविले. त्यावर आधारित प्रश्नांना त्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली .
त्यामध्ये पियुष देसले, कबीर शेख, आरव पाटील, लक्षीता गिरासे, यशस्वी पाटोळे, वेदिका बोरसे, दीक्षा माळी, कैवल्य देवरे सहभागी झाले होते.
भारताशी संबंधित प्रमुख नद्या, पक्षी, प्राणी, राज्याचे नाव, राजधानी, भाषा यावर हेमांगी जगदाळे, दिवेश मराठे, लोकेश गुरव, ईश्वर पाटील, कार्तिक गिरासे, पुनीत माळी, कानुश्री माळी, नील साळुंखे, ईशांत माळी, हमजा शेख, अनिशा माळी,तनय बैसाणे, भूमिका गिरासे, कुणाल पाटील, कार्तिक पवार, रायना कुरेशी, यांनी सहभाग घेतला.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचे नाट्यछटेद्वारे सादरीकरण करून दाद मिळविली.
या विद्यार्थ्यांना दिपाली जयनगरकर, माधुरी पवार, माधवी वाघ, शितल गुरव, स्नेहा देसले, जयश्री माळी, अनिशा नगराळे, हेमाद्री गिरासे, साधना सुतार, नंदिनी माळी, प्रतिभा माळी, साधना परदेशी यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments