Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील साहुर गावी महिलांसह तरुणांचा दारूबंदी गाव निर्धार* *महाराष्ट्र दारूबंदी प्रमुख महिला गीतांजली कोळी व सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांचे अथम प्रयत्नांचे फलित*

      शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील साहुर गावात गेल्या आठ-दहा वर्षापासून दारूबंदीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे सह तरुणांनी आवाज उठवुन संघर्ष सुरु आहे यासाठी जिल्हाधिकारी, दारूबंदी विभाग, दोंडाईचा पोलीस स्टेशन, साहुर ग्रामपंचायत, तहसीलदार  यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन साहुर गाव दारू मुक्त झाले पाहिजे असे प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र प्रमुख दारूबंदी महिला अध्यक्ष गीतांजलीताई कोळी यांच्या मार्गदर्शनाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत साहुर गावात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी निर्धार ही सभा घेण्यात आली . यावेळी गावातील सरपंच गुलाब सोनवणे,पोलीस पाटील मोहन सोनवणे,महाराष्ट्र दारूबंदी महिला प्रमुख गीतांजली ताई कोळी, साहुरचे सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांसह असंख्य महिला व ज्येष्ठ नागरिक,तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पीडित महिलांनी आपल्या भाषेत आपबिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली दारू व्यसनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी साहुर गावाने पाहत असताना गावात कोळी समाजाचे आराध्यदैवत वाल्मीक ऋषी मंदिर व तापीमाई नदीच्या काठी विविध ठिकाणी  हातभट्टी दारु पाडली जाते. व सर्रास विक्री होत असते. त्यास पायबंद घालण्यासाठी आज महिलांसह तरुणांनी एकमुखी निर्णय घेऊन गावात कोणत्याही प्रकारची दारू विक्री होणार नाही यासाठी पोलीस विभाग दोंडाईचा यांच्या मदतीने गावात समिती गठीत करण्यासाठी पुढाकार घेतला. कोणी हातभट्टीची दारू पाडत असेल किंवा विक्री करत असेल त्याविषयी तक्रार तात्काळ 112 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांनी यावेळी केले तसेच गीतांजली कोळी व राहुल सोनवणे यांनीही सखोल दारू पासून होणारे नुकसान याविषयी मार्गदर्शन केले. यापुढे साहुर गावात दारू विक्री व कुणीही दारू पिणार नाही असा दारूबंदी निर्धार यावेळी करण्यात आला त्याचप्रमाणे गावातून गावातील सरपंच गुलाब सोनवणे,पोलीस पाटील मोहन सोनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, गीतांजली कोळी,राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात मंदिर परिसरासह गावातून दारूबंदी निर्धार पथसंचलन करण्यात आले व्यसनाधीन झालेल्या कुटुंबांना देखील प्रत्यक्ष भेटी यावेळी दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments