शिंदखेडा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी ;- शिंदखेडा येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण विभागात कार्यरत दिनेश भरत भामरे यांना जि. प.कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून धुळे येथील जिल्हा परिषद सभागृहात गौरविण्यात आले.
दिनेश भरत भामरे यांना राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य, व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हास्तरीय राज्य आवास योजनेमध्ये द्वितीय क्लस्टर म्हणून पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला.
यावेळी महेश पाटील प्रकल्प संचालक, भावना पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे यांची उपस्थिती होती.
पुरस्कार मिळाबाबद्दल रमेश नेतनराव गटविकास अधिकारी शिंदखेडा पंचायत समिती ,सागर मोगल वरिष्ठ लिपिक,हर्षल माळी वरिष्ठ सहाय्यक,
ग्रामिण गृहनिर्माण अभियंता संघटना धुळे जिल्हा,तसेच शिंदखेडा तालुक्यातील सरपंच ,ग्रामविकास अधिकारी ,रोजगार सहायक संघटना आदींनी अभिनंदन केले,
प्रतिक्रिया:गटविकास अधिकारी श्री.रमेश नेतनराव यांचे मार्गदर्शन लाभले असून वेळोवेळी सहकार्य असते ,या पुढेही शासनाने दिलेली कामे वेळेत पूर्ण करून घरकुल लाभार्थी यांना सर्वतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे दिनेश भामरे यांनी सांगितले.
0 Comments