Header Ads Widget

*शिंदखेडा स्टेशन रोड न्यु भोई गल्ली परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज*. 👉 *न्यु भोई समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन ला निवेदन*


                             शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-                येथील स्टेशन रोड  न्यू भोई गल्ली समाज कल्याण वस्तीगृहाजवळील परिसरात रात्री अपरात्री अनोळखी व्यक्ती फिरताना दिसत आहेत. हयामुळे मोटारसायकल, मोबाईल चोरी होण्याची भिती व प्रमाण वाढु लागली असल्यामुळे रहिवाशीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तरी सदरील परिसरात पोलीस गस्त असण्याची गरज आहे. चोराकडुन बंदोबस्त व्हावा तर रहिवाशीना भयमुक्त करावे या आशयाचे निवेदन निषाद पार्टी चे जिल्हाध्यक्ष अजय भाईदास तमखाने यांच्या नेतृत्वात शिंदखेडा पोलिस स्टेशन ला देण्यात आले. हयावेळी अजय तमखाने,देविदास तमखाने,जगदीश भोई, भिला मोरे, सुनील वाडिले,सोमा मोरे, बापु साठवटे,विनोद तमखाने, अनिल मोरे,राकेश तमखाने,मच्छिन्द्र भोई, दिलीप भोई सह समस्त न्यु भोई नगर येथील रहिवाशी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments