शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोळा उत्साहात साजरा केला. तालुक्यात पावसाळा कमी स्वरुपात असल्यामुळे कभी खुशी कभी गम जाणवत होता. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आजच्या दिवशी आराम देऊन त्यांची पूजा करण्यात आली. सकाळी बैलांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून सिंगांना रंग रंगोटी करण्यात शेतकरी मालक, सालदार दिसत होते. आपल्या लाडक्या सर्जा राजाला आकर्षक फुगे,माळा, रंगांनी सजवले होते त्यानंतर दुपारून शहर व गावातून वाजतगाजत काढण्यात आलेल्या शर्यत पटु राजपाल नरेंद्र पाटील यांचा रुबाब व शंभु ही बैलजोडी शिंदखेडा शहरातील हया मिरवणुकाचे खास वैशिष्ट्य ठरले.नेहमी प्रमाणे गांधी चौकात बैलपोळा निमित्त रिंगण घालत असते परंतु यावर्षी काही प्रमाणात शेतकऱ्यांचा निरुत्साह दिसून आला. कमी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असला तरी वरूण राजाकडे शेतकरी पोळा सणाच्या दिवशी वाट पाहत असतो पण पोळा सण हा बिना पावसाने तसाच निघून गेला. शासनाने शेतकऱ्यांच्या होणारे नुकसान पाहता शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा अशी मागणी हया निमित्ताने दिसत होती. गाव शहरातून मिरवणूक काढल्यानंतर बैलांना पुरणपोळी गोड पदार्थ,धान्य खाऊन घालून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या सणाच्या निमित्ताने शहरातील बैलांची मिरवणूक बरोबर कॉलनी परिसरातील राजपाल नरेंद्र पाटील यांचे रुबाब व शंभू या बैलाची शिंदखेडा शहरातून डीजेच्या तालावर भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली हे शहरातील विशेष वैशिष्ट्य ठरले. या मिरवणुकीत शरद पटू रुबाब व शंभूचे शिंदखेडा चे मालक राजपाल नरेंद्र पाटील,गोकुळ फकीरा रावते, गंगाराम कोळी बिलाखेड चाळीसगाव, बारामती येथील प्रतीक साळुंखे, वैभव साळुंखे, कुमार साळुंखे यांनी खास हजेरी लावली. सोबत अनिकेत पाटील, राकेश पवार, गोलू तमखाने, हर्शल जैन सह शिंदखेडा शहरातील मित्रपरिवार सहभागी झाला होता सदर शर्यत पटु रुबाब याने तालुक्यातील खलाणे सह पेनगाव, खर्जाई, बारामती असे महाराष्ट्रात शर्यतीतून विजयाचा मान कायम राखला आहे या निमित्ताने शिंदखेडा शहराचे नाव महाराष्ट्रात उंचावण्याचा मोठा वाटा आहे. सदर रुबाब बैल हा लाखोंच्या किमतीत मालकाकडून मागितला जात असल्याचे मालकांनी सांगितले परंतु ह्या बैलामुळे आमचे कुटुंबाचे नव्हे तर शिंदखेडा तालुक्याचे नाव रोशन केले आहे. म्हणून किंमत कितीही असो पण या रुबाबचा रुबाब आम्ही कायम तेवत ठेवु असे सांगितले.
0 Comments