शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य
एम डी पाटील यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक अनिल पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले .यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांती दिन जागतिक आदिवासी दिना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे शिक्षक व्ही. एस. पाटील सर व व्ही. एस. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात एम डी पाटील सर यांनी जल, जंगल, जमिनीच्या संवर्धनात शतकानुशतके गुंतलेले निसर्गाचे खरे सेवक आदिवासी समाजाची संस्कृती, अस्मिता आणि अस्तित्व जपण्यासाठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधन व्हावे. त्यांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव व्हावी. म्हणून जगभर आजच्या दिवशी आदिवासी दिवस साजरा केला जातो. आदी काळापासून या भूमीवर वास्तव्यात असणाऱ्या आणि मूलनिवासी म्हणून ओळख असणाऱ्या आदिवासी बंधू ,भगिनींना व विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री.आर आर पाटील यांनी क्रांती दिनाच्या व जागतिक आदिवासी दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या, संस्थेचे सचिव इंजि.उज्वल. पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. जे. भामरे यांनी केले,आभार प्रदर्शन एस. एल. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments