Header Ads Widget

शिंदखेडा येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा* 👉 *हजारोची आदिवासी महिला, पुरुष, तरुण मिरवणुकीत सहभागी* 👉 *आदिवासी संस्कृती चे घडवले दर्शन* 👉 *पालकमंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती व मिरवणुकीत सहभाग*

*
  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-    शिंदखेडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस तालुका आदिवासी एकता परिषदेच्या वतीने साजरा करण्यात आला. सुरुवातीला बंगला भिलाटी सध्याच्या विर एकलव्य नगरात शिंदखेडा गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते क्रांतिवीर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. हयावेळी भिला पाटील, प्रवीण माळी, डॉ. रविंद्र देसले, उल्हास देशमुख, संजय महाजन, बबन सकट आदी उपस्थित होते. त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. हयात विविध आदिवासी संस्कृतीचे देखाव्यातुन दर्शन साकारण्यात आले.विविध आभुषनेतुन महिला, पुरुष, तरुण, तरुणी आदिवासी नृत्यावर मनमुराद आनंद लुटला. आदिवासी गौरव दिनाच्या जयघोषाने शहर दणाणुन गेले होते. हयावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल सह गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी मिरवणुकीत सहभागी होवुन नवतरुणाना प्रेरणा दिली. बंगला भिलाटी पासून मुख्य रस्त्यावर शिवाजी चौफुली, बाजारपेठ, भगवा चौक तर बिजासनी मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.पारंपरिक वादय व डिजेच्या तालावर तरुणाई चांगली थिरकली. समारोप प्रसगी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आदिवासी क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर आदिवासी समाजाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांचा सामुदायिक सत्कार करण्यात आला तसेच शिंदखेडा पोलीस स्टेशन चे एपीआय हनुमंत गायकवाड,आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त यादवराव सावंत यांचा सन्मान करण्यात आला.हयावेळी श्री. रावल यांनी आदिवासी साठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा विविध योजना मोफत सुरु केल्या आहेत.त्याचा लाभ घ्यावा. तसेच आदिवासी मुला मुलींना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध असुन आपल्या पाल्याना शिक्षित करून सुसंस्कृत नागरिक बनवा. घरकुल योजनेतुन लाभ मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाला दिला जात असुन हयापुढे सरकार कडुन दिला जाईल असे सांगितले. हयावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, माजी जि. प. सदस्य रामनाथ मालचे, माजी पंचायत समिती उपसभापती दिपक मोरे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र चव्हाण, टेबलाय सरपंच प्रतिनिधी आण्णा मालचे, विष्णू ईशी, विनोद सोनवणे, सुरेश सोनवणे, रामभाऊ गायकवाड, दिपक फुले, अजय मालचे, मच्छिन्द्र शिंदे, सुरेश मालचे, बापू मोरे, दिलीप सोनवणे, सचिन मालचे, राजु पवार, कैलास मालचे, गुलाबसिग सोनवणे सह शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजातील पदाधिकारी सहभागी होवुन कार्यक्रम यशस्वी केला. तर शिंदखेडा तालुका आदिवासी एकता परिषद व नियोजन समितीचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर मिरवणुकीत शिंदखेडा तालुक्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी समाज एकवटला होता.

Post a Comment

0 Comments