Header Ads Widget

*9 आगष्ट क्रांति दिनानिमित्त विदयापीठ स्तरीय एकदिवसीय कार्यशाळा क्रांती स्मारक साळवे हातनुर येथे संपन्न* *क्रांती स्मारक येथे विर क्रांतिकारकाना अभिवादन*.


                    शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील क्रांती स्मारक साळवे हातनुर येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य, वाणिज्य आणि       कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विदयमाने 9 आगष्ट क्रांती दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला क्रांती स्मारक येथे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे चेअरमन व माजी आमदार बाबासाहेब कुणाल रोहिदास पाटील सह किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर चे सचिव निशांत रंधे, एस. एस. व्ही. पी. महाविद्यालय शिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक बापु पाटील, संचालक प्रा. सुरेश देसले, प्राचार्य एन. एस. पवार, साळवे सरपंच प्रतिनिधी संतोष वाघ, दरबारसिग गिरासे चिमठाणे सह स्वातंत्र्य सैनिक वारस प्रतिनिधी यांनी वीर क्रांतिकारकाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर कार्यशाळा स्थळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थीनी संचलन करून प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. हयावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष माजी आमदार कुणालबाबा पाटील हे होते.तर किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर सचिव निशांत रंधे, एस. एस. व्हि. पी. एस. महाविद्यालय शिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, संचालक प्रा. सुरेश देसले, उमवि जळगाव अधिभाषा सदस्य डॉ. संजय पाटील, प्रा. जयवंत मगर, नितीन ठाकूर, अमोल मराठे, केदारनाथ कवडीवाले, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग सचिन नाद्रे, प्राचार्य एन. एस. पवार, सरपंच प्र. संतोष वाघ साळवे, दरबारसिग गिरासे चिमठाणे,,माजी पंचायत समिती सदस्य प्र.प्रकाश बोरसे,हातनुरचे उपसरपंच दिपक जगताप, वि. का. सो. चेअरमन प्रा. ए. व्ही. पाटील, अविनाश पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. हयावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षास राखी बांधल्या. तसेच खजाना लुटीत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस प्रतिनिधी चा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवुन गौरव केला. अनेक मान्यवरांनी क्रांती दिनानिमित्त आठवणीना उजाडा दिला. तसेच प्रा.सुधाकर सुर्यवंशी यांचे व्याख्यान झाले. एकदिवशीय कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी व विदयार्थीनीना देशसेवा, देशाविषयी आत्मयिता, स्वावलंबन, प्रेरणादायी गुण रुजवुन जागृतता निर्माण केली. प्रास्ताविक प्राचार्य एन. एस. पवार यांनी केले तर कार्यशाळा यशस्वी साठी प्रा. डॉ. सचिन जाधव कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. योगेश अहिरराव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा. आशा कांबळे महिला कार्यक्रम अधिकारी सह राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिंदखेडा महाविद्यालय, उपप्राचार्य, कार्यालयिन अधिक्षक, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विदयार्थीनीनी परिश्रम घेतले. हयासाठी माध्यमिक विदयालय हातनुरचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments