शिर्षक जरा वेगळेच वाटते नाही का ?परंतु माझे स्नेही,मार्गदर्शक ,प्रेरणा स्रोत मा.श्री प्रभाकर सुर्यवंशी यांचे बाबतीत अगदी योग्य आहे.माझे सारखे प्रसिद्धीपासुन लांब राहाणार्याला आपले अंकातुन चारोळी प्रसिद्ध करुन समाजासमोर आणले मी त्यांचा आजन्म ऋणी आहे.
सतत काहीतरी करित राहाणे या यांचेतला नोंद घेणेचा गुण आहे.आपले परिवाराचे समवेत राहुनही समाज परिवाराचा संसार हे गृहस्थ करित असतात.एकदा ओळख झाली की,मित्र,सखा कधी झाले हे कळतही नाहे.ईंग्रजीतली म्हण "one man army" हे खरी करतात.अनेक मान्यवरांची ओळख,त्यांचा सन्मान,सत्कार करतांना पुस्तकरुपी भेट देण्याची पद्धत अणुकरणीय आहे.
स्वतः किती मोठे आहोत याचा साधा ऊल्लेखही त्यांचे बोलण्यातुन,लिहीण्यातुन येत नाही.स्वतःचा "अभिनव खान्देश" असुनही स्वतःच काहीतरी लिहीत राहाण्याचे काम करित नाहीत स्वतःला ऊत्तम चारोळ्या लिहीता येत असुनही.परंतु जेव्हा लिहीतात तेव्हा एकच शब्द येतो..व्वा....
मला गर्व वाटतो की,असे व्यक्तिमत्व,सतत काहीतरी ऊपक्रम करित राहाणारे मानवी यंत्र माझे मित्र आहेत.मी धुळेला असतांही व न राहात असतांनाही त्यांचा माझेवरील स्नेह कमी झाला नाही यातच सरांची महानता दिसते.
माझ्या चारोळी संग्रह "मनातल्या चार ओळी" व काव्य संग्रह "काव्य ह्रदयातले" यांना त्यांनी सुंदर प्रस्तावना लिहील्यात,त्यात त्यांचा प्रतिभाविलास,कल्पनाविलास दिसुन येतो.
मा.श्री.प्रभाकर सुर्यवंशी सरांना ऊदंड आयुष्य लाभो, हा तळपणारा प्रभाकर समाजकार्या करिता अविरत तळपत राहावा हीच सदिच्छा.
विलास घोडचर निवृत्त न्यायाधिश
यवतमाळ
भ्र.९ ८२२२९१५४१
0 Comments