Header Ads Widget

*दोंडाईचा शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा तर रक्तदान शिबीराचे आयोजन* 👉 *विर एकलव्य भिल जनसेवा मंडळाचे आयोजन* 👉 *मिरवणूकीत हजारोचा आदिवासी जनसमुदाय एकवटला*


   शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आज दि.१०/८/२०२५ रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्ताने शहरात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. रॅलीची सुरुवात अमरावती नदिच्या काठापासुन आदिवासी महापुरुषांना अभिवादन व झेंडा दाखवत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे श्रीकृष्ण पारधी आदिवासी नेते रवींद्र जाधव दीपक अहिरे यांसह पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली.  यानिमित्त आयोजित मिरवणूक शोभायात्रेत आदिवासी बांधव विशेषत तरुण तरुणी आणि महिला, हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.  पारंपरिक पोशाखात आणि  वेगवेगळ्या  टी-शर्टमध्ये आदिवासी तरुण-तरुणी या सोहळ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले.
या रॅलींमध्ये पारंपारिक तारपा वाद्य वाजवून तारपा नृत्य तसेच इतर आदिवासी नृत्ये सादर केली. अनेक तरुणांनी विविध वेशभूषा आणि रंगरंगोटी करून कार्यक्रमात उत्साह वाढवला. धुळे जिल्ह्यासह  दोंडाईचा येथील शहर परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
आणि आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर  रॅलीमध्ये  समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.  
रॅली काढून  आदिवासी बांधवांनी या दिनाचा मनमुराद आनंद साजरा केला रॅलीचा श्री राम मंदिर येथे समारोप करण्यांत आला.       तत्पूर्वी सकाळी 
 रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात ५१ रक्तदात्यानी रक्तदान केले. प्रमुख आयोजक विर एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ महाराष्ट्र राज्य धुळे व दोंडाईचा यांच्या संयुक्त प्रयत्नाने संस्थेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष  रविंद्र जाधव, संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंकुश नाईक व  जिल्हा उपाध्यक्ष देविदास मोरे आणि संस्थेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सदाशिव मिस्त्री व सुनील पवार आणि तालुका कार्याध्यक्ष विष्णू ईशी युवा तालुकाध्यक्ष अर्जून  मालचे  दिपक सोनवणे, आदिवासी समाजाचे नगरसेवक राजेश जाधव हजर होते समाजाचे अध्यक्ष छोटू सोनवणे आणि शहरप्रमुख नानजी आहिरे, विष्णू ठाकरे, रवींद्र ठाकरे व  शिंदखेडाचे  भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष  दिपक दादा अहिरे, जिल्हासचिव भिल विकास मंच चे अशोक सोनवणे आणि एटीएस चे रवींद्र ठाकरे क्रांती दलचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे कृष्णा  मालचे सरजु नाईक राहुल सोनवणे रमेश कापुरे रमेश ठाकरे राहुल ठाकरे मनोज ठाकरे मनोज बोरसे बादल ठाकरे संतोष पवार किशोर निकम विजय नाईक जिभाऊ कोळी शेरू मालचे मोहन सोनवणे अशोक सोनवणे दीपक ठाकरे अजय ठाकरे  भटू भिल नाना भिल बळीराम मालचे पप्पू मालचे गोरख मालचे संजय मालचे, श्रावण मालचे रामलाल मालचे , भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे भारत जाधव महेंद्र जाधव रोहित सोनवणे उमेश वाघ रितिक सोनवणे राजपाल जाधव आयुष जाधव  आणि राहुल कापुरे सह सर्व ग्रामीण भागातून असंख्य समाज बांधव  हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. तालुक्यातून महिलांचा समावेश लाक्षणिय होता. प्रास्ताविक रवी जाधव तर आभार  निलेश वाघ यांनी केले  या प्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी  नेतृत्वाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, नरडाणा पोलीस स्टेशनचे  निलेश मोरे, व हवालदार, पोलीस उपनिरीक्षक, होमगार्ड , मोठ्या प्रमाणात पोलीस  बंदोबस्त तैनात होता.
मिरवणूक शांततेत पार पडली.

Post a Comment

0 Comments