शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या 921 कोटी जमा होणार आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई उद्या म्हणजेच सोमवारी (ता -11) शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. यामध्ये खरिपातील नुकसान भरपाई ही 809 कोटी आहे तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
याआधी पीकविम्याची नुकसानभरपाई कंपन्यांकडून त्या-त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती; मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर उद्या म्हणजेच सोमवारी (ता -11) पहिल्यांदाच नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये 'डीबीटी'द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल.
0 Comments