Header Ads Widget

बेटावद येथे गुरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण


बेटावद प्रतिनिधि.

शिंदखेडा तालुक्यातील गाय व  बैलांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या लंम्पी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे त्वरित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

बेटावद येथील श्रेणी २ पशुवैद्यकीय दवाखान्यात लंम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली

यावेळी गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना  लस देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.

डॉ. विक्रम बैसाणे (पशुधन पर्यवेक्षक), डॉ. जयेश देवरे, डॉ. डिगंबर माळी, डॉ. मयूर भामरे यांच्यासह शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते

 या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीही करण्यात आली पुढील टप्प्यात इतर शिवारातील  जनावरांवरही लसीकरण  करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments