Header Ads Widget

नरडान्यातील नागरिकांना कुत्र्यांनी केलेल्या भयभीत वातावरणातून मुक्ततेचा मोकळा श्वाससरपंच सौ मनिषा सिसोदे व गटनेते जितेंद्र सिसोदे माजी यांना कुत्र्यांना पकडण्यात यश

मौजे नरडाणा येथे 30 ऑगस्ट वार शनिवार रोजी एकाच दिवसात झालेल्या कुत्रे चावण्याच्या गंभीर समस्यामुळे   नरडान्यातील वातावरण खूप भयभीत झाले होते येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांना स्वतः जावे लागत होते ही समस्या नागरिकांनी ग्रामपंचायत जवळ मांडली असता सरपंच सौ मनिषा जितेंद्र सिसोदे व गटनेते जितेंद्र सिसोदे माजी जि प सदस्य व ग्रामविकास अधिकारी सागर पाटील उपसरपंच सुनील महाले, चिंधा पाटील ग्रामपंचायत सदस्य कल्पना सिसोदे ग्रामपंचायत सदस्य,वैशाली महाले ग्रामपंचायत सदस्य,जागृती सिसोदे ग्रामपंचायत सदस्य,प्रमिलाबाई सिसोदे ग्रामपंचायत सदस्य ,नामदेव भील ग्रामपंचायत सदस्य,शामा कसबे ग्रामपंचायत सदस्य,मीना कोतवाल  ग्रामपंचायत सदस्य ,व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी तात्काळ कुत्रे पकडविण्याची मोहीम सलग 5 दिवस राबवून नरडाणा गाव व नरडान्यातील नागरिकांना कुत्र्यांनी केलेल्या भयभीत वातावरणातून मुक्ततेचा मोकळा श्वास घेण्यास खूप चांगले काम करण्यात आले असल्याचे गावातील सांगितले लोकांचा तसा प्रतिसाद येत आहे , तरी यावर सरपंच सौ मनिषा सिसोदे व जितेंद्र सिसोदे यांना सदर समस्ये बद्दल विचारले असता त्यांनी थोडक्यात उत्तर देत  जनतेने दाखवलेला विश्वास कधी कमी होणार नाही आणि याच्याही पुढे काही समस्या आल्या तर गावकऱ्यांच्या मदतीने सर्व सोडवू असे आश्र्वासित केले .


Post a Comment

0 Comments