Header Ads Widget

नरडाणा प्रा.आ.केंद्र, सर्व गणेश मंडळे व कै.म.दि.सिसोदे महाविद्यालयाच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न.संजीवनी सिसोदे व कुटुंबीयांचा अवयव दानाचा संकल्प -

 

नरडाणा: दि 4 सप्टेंबर, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व पणन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाे नरडाणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व गणेश मंडळे व कै.म.दि.सिसोदे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान 2025 अंतर्गत आरोग्यनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास सौ संजीवनी ताई सिसोदे मा सभापती जि.प.धुळे यांच्या अध्यक्ष तर श्री नेतनवार गटविकास अधिकारी प स शिंदखेडा, श्री निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरडाणा व प्राचार्य डॉ प्रवीण सिंग गिरासे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिबिरात 82 जणांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले, 12 रुग्णांची हृदयाची तपासणी करून त्यांचे ईसीजी काढण्यात आले व 126 रुग्णांची नियमित रक्त, लघवी, बी.पी व शुगर तपासनी करुन किरकोळ आजारांवर तात्काळ औषधोपचार करण्यात आले.

शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ.पाखोरी जैन यांनी महिला आरोग्य विषयी, दंतचिकित्सक डॉ.प्रितेश जैन यांनी ओरल कॅन्सर विषयी तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय दंतशल्य चिकित्सक डॉ.युगंधरा सिसोदे यांनी मौखिक आजार व दातांची दैनंदिन स्वच्छता या बद्दल माहिती दिली. नरडाणा गावातील सर्व प्रतिष्ठित डॉ.संजय महाले, डॉ.कैलास बडगुजर, डॉ.निखिल अहिरराव, डॉ.निलेश गिरासे, डॉ.संदीप चौधरी, घोटीचे डॉ.सूर्यवंशी यांनीही आरोग्य सेवा दिली.

श्री.सिद्धार्थ सिसोदे यांनी संपूर्ण कुटुंबाच्या अवयवदान संकल्पाची माहिती दिली व उपस्थितांनी अवयवादानाची शपथ घेतली. प्राचार्य डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांनी आयुष्यमान भारत कार्ड विषयी माहिती दिली. श्री नेतनवार यांनी शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली. संजीवनी सिसोदे यांनी वृधोश्री योजने अंतर्गत दारिद्र रेषेतील साठ वर्षावरील वृद्धांसाठी कुबडी, काठी, इत्यादी सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव 9 सप्टेंबर रोजी बर्वे कन्या छात्रालय गरुड बाग धुळे येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी गरजूनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आव्हान पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या वतीने केले. बहुउपयोगी आरोग्य शिबिर आयोजनाबद्दल कौतुक केले. शिबीराचे सविस्तर प्रास्ताविक डॉ.असिफ कच्ची यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.शरद भामरे यांनी केले.
 
यावेळी पिंप्राडचे सरपंच अभिमान भील, नरडाणा मा.सरपंच मन्साराम बोरसे, ग्रामसेवक सागर पाटील, निंबा दादा साळुंखे, सदस्य राकेश नेतले, ज्योती तमायचे, अशोक शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राजपूत व डॉ.असिफ कच्चीसह सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा यांनी अत्यंत सेवाभावीवृत्तीने रुग्णसेवा केली. स्थानिक लोकांनी या शिबिराचा भरपूर लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments