दोंडाईचा ---होय सारथी, हा शब्द महाभारता पासुन प्रचलित आला, भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचे सारथी बनत भगवत गिते द्वारे तत्व, सत्य, आयुष्य, पाप, पुण्य, युद्ध, शांतता असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन करत दिशा दिली, त्या प्रमाणे जगात काही माणस है अनेक गरजुनंच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे मदत करत त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे आधार सारथीचि भुमिका निभावत असतात.
तशीच एक भुमिका आपला जिवा भावाचा माणुस म्हणुन नेहमी नंदनगरीच्या गरजु लोकांच्या आयुष्यात उदार भावनेने मदत, सहकार्य करत निभावण्याचे काम आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब है सतत करत असतात
भैय्या साहेब विधान परिषद आमदार झाले आणि त्यांनी एक महत्व पुर्ण निर्णय घेतला तो म्हणजे अपंग बांधवाना इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल देऊन त्यांचा शारीरीक व मानसिक आधार रुपी सारथी होण्याचा आणि है कार्य त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष कृतीत उतरवले.
त्या अपंग बांधवाना जेव्हा ह्या सायकलिंचे वाटप झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद, तो उत्साह आणि त्यांच्या मनातील आनंदाचा वाहणारा धबधबा हा प्रत्यक्ष जाणवत होता, आणि त्यांचा तो आनंद पाहून स्वतः आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी साहेब व मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रत्नाभाभी रघुवंशी यांना जे समाधान वाटत होते तो प्रसंगच असा होता कि घरातील एखाद्या जेष्ठ माणसाने घरातील सदस्यांना हवी असलेली अन ती मिळणे अपेक्षित नसणे अशी वस्तू दिल्यावर जो प्रसंग त्या घरात होतो अगदी तसाच.
त्या अपंग बांधवा सॊबत आलेले त्यांच्या परिवारातील सदस्य तर भैय्या साहेब व भाभीजी यांचे आभार व्यक्त करत असताना त्यांना भैय्या साहेब व भाभीजी यांच्या तोंडून निघालेले शब्द म्हणजे आम्ही आहोत ना काळजी नका करू है एक हक्काचा आधार देऊन गेली, आणि अपंग बांधवांच्या बाबतीतील असलेली चिंता मिटऊन गेली.
बस हा प्रसंग पाहून मनात एकच विचार आला कि गरजु व्यक्तींना मदत, सहकार्य करण्यासाठी लोकाभीमुख असे काम करण्यासाठी उपजत गुण असावे लागतात ते न कुठे भेटतात ना प्राप्त होतात आणि है गुण आपल्या रघुवंशी परिवारातच आहेत याचे समाधान वाटते.
0 Comments