Header Ads Widget

*माझे शहर माझी जहागिरदारी भांडायला मात्र कार्यकर्ते !!!*




सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे, निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे, परवा अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख संपली,त्यानंतर कोण कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले याची गणिते मांडली जाऊ लागली, एकंदरीत पहाता या निवडणुकीत खरं तर माझे शहर माझी जबाबदारी अशी घोषणा असली पाहिजे पण त्या ऐवजी नगरपालीका नगरपंचायत निवडणूकीत  " माझे शहर माझी जहागिरदारी "  असे चित्र धुळे जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडेच पहावयास मिळत आहे,यंदाच्या नगरपालीका नगरपंचायत निवडणुकीत महत्वाची नगराध्यक्ष पदे नेत्यांनी  आपल्याच घरातील बायको, आई, भाऊ, मुलगा, मुलगी अशांनाच दिली गेल्याचे चित्र दिसून येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी असतात असे सांगतात,पण  नगरपालीका आणि नगरपंचायत निवडणुकीत यंदा या पेक्षा उलट चित्र महाराष्ट्रात सगळीकडेच पहावयास मिळते आहे, मग सामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे?! सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त नेत्यांच्या सतरंज्या उचलायच्या, निवडणूकीत नेत्याचा नावांचा जयघोष करत झेंडे मिरवायचे, मारामारी करुन आपल्या वर केसेस दाखल करुन घ्यायच्या, नेत्यांच्या बायका मुले मुलगी भाऊ बहिण आई यांच्या नावाने जयघोष करीत 
यांच्याच पालख्या कार्यकत्यांनी उचलायच्या, नेत्यांच्या नातवांचे  डायपर बदलायचे?! याच कामासाठी नेत्यांना कार्यकर्ते लागतात का? नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी नेत्यांनी आपल्या घरातील पत्नी,मुले, बायको, भाऊ, बहिण, आई यानाच उमेदवारी दिली गेली आहे, निवडणुकीत हेच चित्र अख्खा महाराष्ट्रात दिसते आहे, घराणेशाहीच्या नावाने बोटे मोडण्याऱ्या  भाजपाने यंदाच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेची एकाच घरातील नगराध्यक्ष पदासाठी गजानन सुर्यवंशी तर नगरसेवक पदासाठी  त्यांची पत्नी,भाऊ भावजय, मेहुणे आणि त्यांची पत्नी अशा एकाच घरातील सहा जणांना भाजपची उमेदवारी देऊन  भाजपने घराणेशाही स्विकारुन सर्वात जास्त  पदे बहाल करुन टाकली आहेत, आकड्यात सांगायचे झाल्यास ज्यांना कौटुंबिक राजकीय वारसा आहे अशा नगरपालिका,नगरपंचायत, निवडणुकीत साठ टक्के पेक्षा जास्त पदे नेत्यांच्या नातेवाईकांना दिली गेली आहेत, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदे नेत्यांच्या नातेवाईकांना साठी अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे की काय असे चित्र आपण सर्वत्र पहात आहोत, पक्षाची बाजू मांडायला, लढाईला भांडायला, सामान्य कुटुंबातील, राजकीय वारसा नसलेले कार्यकर्ते,?! पदे भोगायला मंत्री आमदार खासदारांची मुले, मुलगी ,बायको, भाऊ, बहिण, आई, हीच खरी लोकशाही का?! यालाच पुरोगामी महाराष्ट्राचे चित्र म्हणायचं का?! राज्याच्या विविध चॅनेल वर प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू मांडायला,भांडायला, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्या घरातला एकही चेहरा दिसणार नाही, चॅनेल वर पक्षांची बाजू मांडायला,भांडायला, मात्र सामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेले कार्यकर्तेच दिसतील,?! प्रत्येक राजकीय पक्षांची प्रवक्ते पदे  तपासून पाहिले तर फडणवीस, शिंदे, आणि पवार यांच्या घरातील कोणाचे ही नाव दिसणार नाही, नगराध्यक्ष पदासाठी मात्र आई, वडील, भाऊ, बहीण, आणि बायको यांचीच नावे दिसतील हे चित्र महाराष्ट्रात सगळीकडेच  तुम्हाला पहावयास मिळतील,सध्याचे राजकीय पक्ष कुठे ही कोणा सोबत ही आघाडी युती करायला तयार आहे, कोण कोणाचा विरोधात, आणि कोणा सोबत लढताना दिसतो आहे,हे कळायला मार्ग नाही, एकमेंकांचे आई वडिलांचा उध्दार करणारे यंदाच्या निवडणुकीत एकमेकांना गळ्यात गळे घालून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत,जे सत्तेत मित्र आहेत ते निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात हमरीतुमरीवर येऊन निवडणूक लढतांना दिसत आहेत, कोणाच्या ही अजेंड्यावर जनतेच्या हितासाठी कोणताच कार्यक्रम नाही, नगराध्यक्ष पदांवर आपल्याच नातेवाईकांना बसवून आपली सत्ता बळकट करण्यासाठी नेत्यांनी चालवलेली धडपड हाच अजेंडा आहे,याला कारणीभूत आहे मतदार,! जे मतदार एका रात्रीतून आपल्या मतांचा बिर्याणी एक क्वार्टर वर सौदा करतात, आपली आयुष्यातील पाच वर्षं नेत्यांची गुलामी पत्करतात,यातून जन्म घेते ही टॅग लाईन " माझे शहर माझी जहागिरदारी. " हेच जर मतदारांनी आपले मत इमानदारीने चांगल्या प्रामाणिकपणे काम करत असलेल्या उमेदवारांना दिले तर त्यासाठी वेगळी टॅग लाईन असेल. ". माझे शहर माझी जबाबदारी. " ?!!
  🌸 अरूण पाटील 🌸
        

Post a Comment

0 Comments