सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय या विद्यालयात नुकताच वैद्यकीय तपासणी करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय या विद्यालयात वालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून इ.१०वीच्या विद्यार्थ्यांना TDT लस इंजेक्शन देण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय श्री एस.ए.कदम सर व डॉक्टर जयश्री पाटील,सहकारी मंडळी व वर्गशिक्षक श्री पी आर पाटील सर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ जयश्री पाटील यांनी आरोग्य विषयक महत्त्व माहिती व्यक्त केली.तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब यांनी जन्मापासून मिळणाऱ्या लसी बाबत आरोग्य दृष्टिकोनातून महत्त्व पटवून देतांना म्हणाले की,विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिगत आरोग्य स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता या एकमेकांना निगडित बाबी आहेत उदा.घर,शाळा- वर्ग,परिसर,सार्वजनिक परिसर इ.आपापल्यापरीने "स्वच्छता राखणे ही एक काळाची गरज आहे".कारण सार्वजनिक स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नव्हे तर सार्वजनिक म्हणजेच सर्वांची जबाबदारी आहे या दृष्टीने प्रयत्न केल्यास आपले घर,आपला परिसर,आपली शाळा,आपले गाव,तालुका जिल्हा,विभाग,स्वच्छ राहिल. तर एक 'नागरिक' म्हणून आरोग्य व सार्वजनिक स्वच्छतेबाबतचे साधे-साधे नियम पाळावेत -सार्वजनिक ठिकाणी कुठे ही थुंकू नये,ध्रुमपान करू नये,कचरा टाकू नये,
*व्यक्तिगत आरोग्य मूलमंत्र*
वैयक्तिक स्वच्छता,हवा आणि सूर्यप्रकाश,पाणी,आहार,विश्रांती व झोप,व्यायाम,व्यसनमुक्त जीवन,मनःशांती,वैद्यकीय तपासणी.
*कारण आपण पाहतो की,
*पाण्यामार्फत पसरणारे रोग*- विषमज्वर काॅलरा (पटकी), अमांश हगवण,कावीळ.
*हवे मार्फत पसरणारे रोग*- सर्दी,खोकला, प्ल्यू.
*कीटकांमार्फत पसरणारे रोग* - डास -मलेरिया ,डेंगू ,हत्तीपाय. केमरू - ताप,तोंड येणे,काळा आजार. ऊ- ताप. घरमाशी - पटकी, अमांश हगवण. पिसवा - प्लेग,ताप. ढेकूण - ताप.
इत्यादी विषयी माहिती देत कोराना सारख्या महामारी रोगाविषयीचे महत्त्व पटवून देत "पर्यावरण विषयक संवर्धन करणे ही एक काळाची गरज आहे".
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.
0 Comments