अमळनेर- तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेल्या नीम येथील वि.का.सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन शहापूर येथील एकात्मता हायस्कुलचे मुख्याध्यापक आनंदा खंडू धनगर व
व्हाईस चेअरमन पदी विनोद चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. आनंदा धनगर हे निम येथील माजी सरपंच ज्येष्ठ समाजसेवक स्व. खंडू डिगंबर हडप यांचे सुपुत्र असून वडीलांकडून त्यांना समाजसेवेचा वारसा लाभला आहे.सभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल महाजन, व सचिव दिलीप साहेबराव पाटील उपस्थित होते. यावेळी गावातील ज्येष्ठ समाजसेवक मार्गदर्शक नेते मगन भाऊसाहेब पाटील, प्रविण चौधरी, पंढरीनाथ चौधरी , हिलाल सैंदाणे, छोटू आप्पा , राजेंद्र चौधरी सर, तुकाराम बापू , सखुबाई चौधरी , भारती चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते. उभय पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे नीम ग्रामस्थांनी स्वागत, अभिनंदन केले ..
0 Comments