Header Ads Widget

दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक बिनविरोध विजय: मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली सर्व २६ जागा ताब्यात

दोंडाईचा : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नवा इतिहास रचला आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी पक्षांनी माघारी घेतल्याने ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध ठरली आहे. नगराध्यक्षपदी मंत्री रावल यांच्या मातोश्री सौ. नयनकुंवरताई रावल यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या ४० वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच अशी बिनविरोध निवडणूक झाली असून मंत्री रावल यांचे राजकीय वजन ठळकपणे अधोरेखित झाले आहे

दोंडाईचा :  ।  राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांनी धुळे जिल्हयातील जवळपास 70 हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरीषदेची निवडणुक पूर्णत: बिनविरोध करण्यात त्यांना यश आले असून नगराध्यक्षांसह एकुण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत, भाजपाच्या विरोधात वेगवेगळया प्रभागातून शिवसेना उबाठा, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार , एम.आय.एम. व समाजवादी पार्टी अपक्ष अशा विविध  पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते पंरतू या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नरगपालिकेची निवडणुक पहिल्यांदाच  बिनविरोध झाली आहे दरम्यान 1952 साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरीषद निवडणुक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. दोंडाईचा वरवाडे नगरपरीषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षापासुनचा संघर्ष बाजूला सारून डॉ.हेमंत देशमुख् गटाला भाजपावासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले, त्यानंतर रणनिती आणून मंत्री रावल यांनी सुरवातीला नगराध्यक्ष सौ.नयनकुंवरताई रावल व 7 जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते, पंरतू माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत सर्व 19 जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध झाल्याने ना.रावल यांचे राजकीय वर्तुळातील महत्व ठशीवपणे अधोरेखीत झाले आहेत. दोंडाईचा वरवाडे नगरपरीषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षापासुनचा संघर्ष बाजूला सारून डॉ.हेमंत देशमुख् गटाला भाजपावासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले, त्यानंतर रणनिती आणून मंत्री रावल यांनी सुरवातीला नगराध्यक्ष सौ.नयनकुंवरताई रावल व 7 जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते, पंरतू माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत सर्व19 जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. आज माघारीच्या दिेवशी सर्वच विरोधकांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. दोंडाईचा नगर परिषद बिनविरोध झाल्यानंतर रावल गढीसह दोंडाईचा शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. ना. जयकुमार रावल यांना भाजपेयींनी डोक्यावर घेतले.

Post a Comment

0 Comments